आष्ट्यातील साैद्यात हळदीला ३१ हजार दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST2021-03-08T04:25:50+5:302021-03-08T04:25:50+5:30

आष्टा : आष्टा येथील हळद बाजारात इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने रविवारी हळद सौदे घेण्यात आले. यात हळदीला ...

31,000 for turmeric in Ashta | आष्ट्यातील साैद्यात हळदीला ३१ हजार दर

आष्ट्यातील साैद्यात हळदीला ३१ हजार दर

आष्टा : आष्टा येथील हळद बाजारात इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने रविवारी हळद सौदे घेण्यात आले. यात हळदीला ३१ हजार दर मिळाल्याने हळदीला सोन्याची झळाळी प्राप्त झाली आहे.

आष्टा हळद मार्केटमध्ये हळदीचा चौथा सौदा पार पडला. या हळद बाजारात १७०० पोती आवक झाली. मिरजवाडीचे सरपंच विपीन खोत यांच्या हळदीला ३१ हजार रुपये दर मिळाला. बाजीराव पाटील यांनी ही हळद विकली. दीपकराज अशोक नायकवडी यांच्या हळदीला २२ हजार दर मिळाला. रवींद्र कुपाडे यांनी हळद विक्री केली.

हळदीला उच्चांकी दर मिळाल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अल्लाउद्दीन चौगुले, सचिव विजय जाधव, बाजीराव पाटील, रवींद्र कुपाडे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

सभापती अल्लाउद्दीन चौगुले म्हणाले की, कोरोनाचे संकट असल्याने हळदीच्या औषधी गुणधर्मामुळे तसेच सरकारने निर्यातीला प्रोत्साहन दिल्याने हळदीचा दर वाढत आहे. दर असेच वाढत राहणार असून आता परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी आष्टा येथील हळद उपबाजारात हळद विक्रीसाठी पाठवून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

चाैकट

१७३० पोती आवक

या हळद बाजारात क्रमांक १ च्या हळदीला ३१ हजार ते ११ हजार, क्रमांक २ हळदीला ९ हजार ते ११ हजार, कणी ७ हजार ५०० ते ८ हजार ५००,

अंगठी गठ्ठा ८ हजार ते ९ हजार ५००, सोरा १७ हजार ते २१ हजार दर मिळाला. एकूण १७३० पोती आवक झाली.

Web Title: 31,000 for turmeric in Ashta