जिल्ह्यात कोरोनाचे नवीन २६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:24 IST2021-03-07T04:24:03+5:302021-03-07T04:24:03+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील तुलनात्मक वाढ कायम आहे. शनिवारी २६ जणांना कोरोनाचे निदान झाले असून २० जण कोरोनामुक्त ...

26 new corona patients in the district | जिल्ह्यात कोरोनाचे नवीन २६ रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे नवीन २६ रुग्ण

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील तुलनात्मक वाढ कायम आहे. शनिवारी २६ जणांना कोरोनाचे निदान झाले असून २० जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या सहा दिवसांपासून सरासरी २० च्या वर बाधित आढळून येत आहेत.

शनिवारी महापालिका क्षेत्रात ९ तर आटपाडी, खानापूर आणि वाळवा तालुक्यात प्रत्येकी चार रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआर अंतर्गत ३८९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात १५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर रॅपिड अँटिजेनच्या ६७९ जणांच्या नमुन्यांच्या तपासणीतून १३ जण बाधित आढळले आहेत.

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २३१ रुग्णांपैकी ४५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ३८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर ७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सोलापूर व बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येकी एकास कोरोनाचे निदान झाले आहे.

Web Title: 26 new corona patients in the district