शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

१४१ गावांत पाणीसाठा वाढणार

By admin | Updated: May 4, 2015 00:35 IST

जलयुक्त शिवार : जिल्ह्यात ९८ कोटींची तरतूद

सांगली : जिल्ह्यातील गावांमध्ये पाणीसाठा वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून, यासाठी जिल्ह्यातील १४१ गावांची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ९८ कोटी २९ लाखांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवाराचा प्रारंभ २६ जानेवारी रोजी करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानातून गावा-गावात पाणीसाठे निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या अभियानातून गावातील पाण्याचे स्रोत पुन्हा जिवंत करण्याच्या कामास प्राधान्य दिले जात आहे. जिल्ह्यात यावर्षी १४१ गावांची निवड करण्यात आली आहे. या अभियानातून जलसंधारणाची १ हजार ३५१ कामे घेण्यात येत आहेत. यासाठी ९८ कोटी २९ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. शिराळा, वाळवा व पलूस तालुक्यातही हे अभियान राबविण्याबाबत शासनस्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. जलयुक्त शिवारामुळे गावा-गावात पाणीसाठा निर्माण होण्यास मदत होणार आहे. यामुळे भविष्यात टँकरमुक्त गाव होण्यास मदत होणार आहे. जलयुक्त शिवारामुळे भूजल पातळीही वाढण्यास मदत होणार आहे. या जलयुक्त शिवाराचा आगामी चार-पाच वर्षात चांगला उपयोग होणार आहे. आगामी काळात शिराळा, वाळवा व पलूस तालुक्यातही जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे. टप्प्या-टप्प्याने हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) पेरणी क्षेत्र वाढण्यास मदत जलयुक्त शिवारामुळे पेरणी क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. गतवर्षीच्या खरीप हंगामात ३ लाख ९१ हजार २०० हेक्टर इतके सर्वसाधारण क्षेत्र होते. त्यापैकी ३ लाख ४२ हजार ९०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. पेरणीची ही टक्केवारी ९३.६ टक्के इतकी आहे. यावर्षी हे क्षेत्र वाढणार आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी पुरेसे बी-बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा साठा उपलब्ध करुन देण्याबाबत कृषी विभागाने नियोजन केले आहे.