सांगली : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकास १३ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी युसूफ मोहम्मदहुसेन नदाफ (रा. विनायकनगर, वारणाली, सांगली) यांनी शैलेश विठ्ठल पेटकर (रा. प्रगती कॉलनी सांगली ) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना दि. २० जून २०२० ते १८ ऑगस्ट २०२० च्या दरम्यान घडली.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी नदाफ आणि संशयित पेटकर यांची ओळख आहे. यातून पेटकर याने फिर्यादीचा भाऊ खालिद यास नोकरीस लावण्याचे आमिष दाखविले व पैशाची मागणी केली. सुरुवातीला त्यांच्याकडून त्याने पाच लाख रुपये घेतले. यासह फिर्यादीचा मित्र मुजफ्फर याची बहीण निलोफर यांना नोकरीस लावण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून आठ लाख घेतले. मात्र, दोघांनाही नोकरी न मिळाल्याने त्यांनी पेटकर याला दिलेले पैसे परत मागितले. मात्र, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्यादी युसूफ नदाफ यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगलीत नोकरीच्या आमिषाने एकास १३ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 16:30 IST