शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

कसं आहे तुमचं मूल? त्याची आयक्यू टेस्ट आपण केलीत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 12:54 IST

कमी आकलनक्षमता असलेल्या मुलांचं भवितव्य आपण लावू शकतो मार्गाला

ठळक मुद्देआपलं मुलं कसं आहे, हे समजून घेण्यासाठी सर्वच पालकांनी मुलांची आयक्यू टेस्ट करून घेतली पाहिजे.जी मुलं सर्वसाधारणही नाहीत आणि कमी बुद्धिमानही नाहीत, अशा काठावर असलेल्या मुलांना नेहमीच मोठया समस्यांना तोंड द्यावं लागतंआयक्यू टेस्ट करून घेतलेली असली तर मग त्यावर निश्चितच उपाय शोधता येतो आणि त्यापद्धतीनं मुलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी अधिकचे प्रयत्नही करता येतात.

- मयूर पठाडेप्रत्येकाला आपलं मूल हुशारच हवं असतं किंवा हुशारच वाटत असतं. परंतु दुर्दैवानं प्रत्येकवेळी परिस्थिती तशीच असते असं नाही. कारणं अनेक असतात, पण बºयाचदा काही मुलं नैसर्गिक गणवत्तेपेक्षा कमी गुणवत्तेची असतात. त्यात त्या मुलांचा काहीच दोष नसतो. अगदीच कमी बुद्धिमत्तेची मुलं असली, तर निदान ते लगेच लक्षात तरी येतं, पण जी मुलं अगदी काठावर असतात, त्यांना मात्र खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.मुलांची बुद्धिमत्ता मोजायची कशी? त्यासाठी ‘आयक्यू’ (इंटेलिजंट कोशन्ट) पद्धतीचा, वापर केला जातो. समजा हा आयक्यू शंभर आहे असे मानले तर तर ८५ ते शंभर पर्यंतचा आयक्यू असलेली मुलं सर्वसाधारण मानली जातात. ज्यांचा आयक्यू ७० ते ८५ या दरम्यमान आहे अशी मुलं कमी बुद्धिमत्तेची मानली जातात, तर ज्यांचा आयक्यू ७०च्या खाली आहे अशी मुलं गतिमंद समजली जातात.आपलं मुलं कसं आहे, हे समजून घेण्यासाठी सर्वच पालकांनी खरंतर मुलांची आयक्यू टेस्ट करून घेतली पाहिजे.जी मुलं सर्वसाधारणही नाहीत आणि कमी बुद्धिमानही नाही, अशी काठावर असलेली मुलं नेहमीच मोठ्या संकटात सापडतात. कारण बºयाचदा त्यांची आकलनक्षमता कमी आहे, हेच लवकर लक्षात येत नाही.त्यामुळे आयक्यू टेस्ट करून घेणे हे केव्हाही उत्तम.अशी आयक्यू टेस्ट करून घेतलेली असली तर मग त्यावर निश्चितच उपाय शोधता येतो आणि त्यापद्धतीनं मुलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी अधिकचे प्रयत्नही करता येतात. आजकाल त्याचमुळे अनेक शाळांचा मुलांची आयक्यू टेस्ट करून घेण्याकडे कल असतो आणि त्याबाबत ते पालकांना आग्रहही करीत असतात.आपलं मूल कसंही असो, त्याची आयक्यू टेस्ट केल्यानं बिघडत तर काहीच नाही, पण समजा दुर्दैवानं जर काही अडचण असलीच, तर ती लवकर लक्षात येऊन ती सुधारता येते आणि आपल्या मुलांचं भविष्यही त्यामुळे काजोळण्यापासून वाचू शकतं..