शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुलं हुशार आहेत, पण त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स कमी का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 15:38 IST

पालक म्हणून ही एक जबाबदारीही आपल्याला पार पाडावी लागेलच..

ठळक मुद्देमुलांच्या भावनांचा प्रतिसाद तीव्र असला, तरीही पालक म्हणून तो आपल्याला समजून घेता आला पाहिजे.मुलांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतानाच मुलांनाही त्याबाबत अवगत केलं पाहिजे.मुलांनी त्यांच्या भावनांबाबत मोकळेपणी पालकांशी बोलावं यासाठीचं वातावरण मुलांना उपलब्ध करुन द्यायला हवं.

- मयूर पठाडेमुलांसाठी काय करायचं आपण बाकी ठेवतो? मुलांचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी पालक त्यांना जे जे शक्य असेल, ते ते सारं काही करतात, इतकंच काय, जे अशक्य तेही शक्य करण्याचा प्रयत्न करतात..पालकांच्या या प्रयत्नांचं यश बºयाचा मुलांच्या कर्तबगारीत दिसतंही. मुलं हुशार होतात, अनेक क्षेत्रात ते भराºया मारतात, त्यात निसंशय पालकांच्या कर्तव्याचा आणि त्यांच्या मेहनतीचा वाटा मोठाच असतो..पण बºयाचदा मुलं कमी पडतात, ते आपल्या भावभावनांवर कंट्रोल ठेवण्यात. या भावना कशा हाताळायच्या हेच त्यांना कळत नाही. आजकाल तरुण मुलांच्या आत्महत्त्यांचं प्रमाण वाढलेलं दिसतंय, त्यामागेही भावनांचा हाच गोंधळ कारणीभूत आहे. आपल्या भावना कशा हाताळायच्या याचं शिक्षणच त्यांना मिळत नाही किंवा त्यात ते कमी पडतात.आपला इमोशल इंटेलिजन्स वाढावा यासाठी मुलांनी जसे प्रयत्न केले पाहिजेत, तसेच त्यासाठी पालकांनीही त्यांना मदत केली पाहिजे.इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यासाठी काय कराल?१- सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मुलं कोणत्याह्ी पद्धतीनं रिअ‍ॅक्ट झाली, आपल्या भावनांचा त्यांचा प्रतिसाद तीव्र असला, तरीही पालक म्हणून तो आपल्याला समजून घेता आला पाहिजे. त्यानं अशा पद्धतीनं प्रतिक्रिया का दिली आणि त्यावर उत्तर शोधायचा प्रयत्न.. या गोष्टी त्यानंतर. पण पहिल्यांदा मुलांच्या इमोशन्स समजून घ्या.२- काही वेळा मुलांनाच आपण भावनांच्या कोणत्या जंजाळात अडकलो आहोत, हे समजत नाही किंवा त्याविषयी ते कुणाशी बोलत नाहीत. अशा वेळी, ‘तुझा आज मूड नाही का? तू आज अपसेट का दिसतो आहेस?, कसली चिंता तुला वाटते आहे?..’ अशा पद्धतीनं मुलांशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतानाच मुलांनाही त्याबाबत अवगत केलं पाहिजे.३- आपल्या मुलांनी त्यांच्या भावनांबाबत पालकांशी बोलावं यासाठी त्यांना कायम प्रोत्साहित करायला हवं.४- अनेकदा आपण आपलाच विचार करतो, पण त्याच परिस्थितीचा दुसरा व्यक्ती कसा विचार करीत असेल, त्याला काय वाटत असेल, याचा विचारच आपण करीत नाही. दुसºयाच्या भावनांना समजून घेण्याचा परकाया प्रवेश मुलांना साधता आला तर आपल्याही भावनांवर ते उत्तम नियंत्रण ठेऊ शकतात.५- मुलांमध्ये कुठल्याही कारणानं टेन्शन निर्माण होतंय, ते अपसेट दिसताहेत, हे लक्षात आल्याबरोबर मुलांशी संवाद साधून हे टेन्शन कमी करण्यात जर पालकांचाही हातभार असेल तर पालक आणि मुलं यांच्यातील भावनांचा बंध तर अधिक अतूट होतोच, पण मुलंही अनावश्यक टेन्शनपासून वाचतात.मुलांमधील इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्याचे आणखीही काही उपाय आहेत, त्याविषयी पाहू या पुढच्या भागात..