शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेने २५ लाख थकवले

By admin | Updated: July 7, 2015 23:13 IST

चिपळूण : पालिकेचे भाडे वसुलीसाठी स्मरणपत्र

चिपळूण : शहरातील नगर परिषदेच्या इमारतीत सुरु असणाऱ्या ३ शाळांचे जिल्हा परिषदेकडून थकीत भाडे अद्याप वसूल झालेले नाही. याबाबत संबंधित शाळा व शिक्षण विभागाला वेळोवेळो कळवूनही दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर या शाळांना स्मरणपत्र पाठविण्यात आले आहे.चिपळूण नगर परिषदेतर्फे बांधण्यात आलेल्या पाच इमारती जिल्हा परिषदेकडे भाडेतत्त्वावर शाळा चालवण्यासाठी देण्यात आल्या होत्या. त्यापैकी बापट आळी कन्याशाळा, पाग मुला-मुलींची शाळा यांनी थकीत भाडे भरले आहे. उर्वरित वडार कॉलनी शाळा, चिंचनाका नं. १, पेठमाप मराठी व उर्दू या शाळांचे थकीत भाडे नगर परिषद प्रशासनाकडे अद्याप भरण्यात आलेले नाही. थकीत शाळांचे भाडे ठरलेल्या मुदतीत भरण्यात आले नाही तर या शाळा ताब्यात घेण्याचा ठराव मागील झालेल्या सभेत करण्यात आला. मात्र, शाळा सुरु होऊन दुसरा महिना सुरु झाला तरी थकीत शाळांनी अद्याप नगर परिषद प्रशासनाकडे भाडे भरलेले नाही. अंदाजे २५ लाख रुपये भाड्यापोटी नगर परिषद प्रशासनाला येणे बाकी आहे. थकीत भाडे मिळण्याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही भाडे भरण्याबाबत कोणतीच हालचाल केली जात नाही. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने संबंधित विभाग व शाळांना पुन्हा स्मरणपत्र पाठवून थकीत भाडे भरण्याबाबत सूचना केली आहे. (वार्ताहर)थकीत भाडे वसूल कधी होणार शहरातील तीन शाळांच्या थकीत भाडे वसुलीचा प्रश्न ऐरणीवर असून, गेले अनेक महिने ते वसूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत ते वसूल न झाल्यामुळे परिषद प्रशासनापुढे आव्हान निर्माण झाले आहे. या शाळांना स्मरणपत्र पाठविण्यात आली आहेत.