शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
4
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
5
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
6
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
7
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
8
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
9
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
10
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
11
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
12
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
13
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
14
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
15
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
16
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
17
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
20
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले

By admin | Updated: May 20, 2015 00:14 IST

सेवाप्रणालीचे काम अपूर्ण : क आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर

रत्नागिरी : सेवा प्रणालीचे काम अपूर्ण असल्याने जिल्हा परिषदेच्या ३२०० कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन रखडले आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी अडचणीत आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर न होण्याचे प्रमाण वाढले आहे. क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन न मिळाल्यास त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मे महिन्याची सुट्टी असल्याने अनेक कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय सुट्टीनिमित्त फिरायला बाहेर जातात. तसेच बहुतांश कर्मचारी परजिल्ह्यातील असल्याचे त्यांचे कुटुंबीय गावी जातात. त्यासाठी त्यांना आपल्या वेतनावरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणे अवश्यक आहे. जिल्हा परिषदेचे सेवार्थ कर्मचारी ३२०० आहेत. या कर्मचाऱ्यांना सेवार्थ प्रणालीचे काम गेले कित्येक दिवस सुरु आहे. मात्र, ते पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे त्यांच्या खात्यावर वेतन जमा करणे प्रशासनाला अडचणीचे होत आहे.कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळावे, यासाठी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष वामन कदम यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांना भेटले. त्यावेळी त्यांनीही सेवार्थ प्रणालीमुळेच वेतन रखडलेल्याचे सांगून ते काम पूर्ण झाल्याशिवाय वेतन देण्यात अडचण असल्याचे स्पष्ट केले. मात्र त्यासाठी वेतन आणखी किती दिवस रखडणार आहे, असा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावत आहे. वेतन झालेले नसल्यामुळे ऐन सुट्टीत अशा कर्मचाऱ्यांना कुटुंबासाठीही खर्च करणे अवघड बनले आहे.जिल्हा परिषदेतील हा प्रश्न गेले अनेक महिने गाजत असून याबाबत वेळीच आवाज उठवावा, अशी मागणी करण्यात या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. (शहर वार्ताहर)