दुथडी भरून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीत तरुणाने घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 06:46 PM2021-07-13T18:46:34+5:302021-07-13T18:48:33+5:30

Crimenews Ratnagiri: दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे. अशातच सोमवारी जुना बाजारपुल पुराच्या पाण्याखाली गेलेला असताना त्यावरून एका तरुणाने थेट नदीपात्रात उडी घेतली. सुदैवाने तो बजावला. मात्र त्याची स्टंट बाजी सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. दारूच्या नशेत हा प्रकार घडल्याचे पुढे येत आहे.

The young man jumped into the Vashishti river which was overflowing | दुथडी भरून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीत तरुणाने घेतली उडी

दुथडी भरून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीत तरुणाने घेतली उडी

googlenewsNext
ठळक मुद्देचिपळुणातील तरूणाच्या स्टंटबाजीने सारे झाले अवाकदारूच्या नशेत घडला प्रकार

चिपळूण : दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहत आहे. अशातच सोमवारी जुना बाजारपुल पुराच्या पाण्याखाली गेलेला असताना त्यावरून एका तरुणाने थेट नदीपात्रात उडी घेतली. सुदैवाने तो बजावला. मात्र त्याची स्टंट बाजी सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. दारूच्या नशेत हा प्रकार घडल्याचे पुढे येत आहे.

येथे सोमवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे वाशिष्ठी व शिवनदी दुथडी भरून वाहत होती. त्यातच सायंकाळी भरतीचे पाणी वाढल्याने जुना बाजारपुल पाण्याखाली गेला होता, तर नवीन वाशिष्ठी पुलाच्या दोन्ही बाजूला पाणी होते.

अशात एक तरुण जुन्या पुलाच्या रेलिंगवर चढला आणि हात उंचावून ओरडू लागला. त्यामुळे त्याच्याकडे अनेकांचे लक्ष वेधले. त्यातच त्याने थेट नदी पत्रात उडी घेतली. त्यानंतर त्याने पाण्याचा मोठा प्रवाह असताना जुन्या पुलाच्या दिशेने पोहत जाण्याचा प्रयत्न केला. तिथपर्यंत तो पोहचलाही. परंतु तेथून त्याचा हात निसटला आणि पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहू लागला.

त्यामुळे नवीन पुलावर उपस्थित असलेल्यांमध्ये गोंधळ उडाला. तेथून नजीकच असलेल्या नवीन पुलाला पाणी लागून जात होते. त्यामुळे तो नवीन पुलाखाली गेल्यास पाण्याच्या प्रवाहात गुदमरून जाण्याची शक्यता होती. त्यामुळे त्याला काहीजण किनाऱ्यावर येण्याचा इशारा करत होते.

परंतु, तोपर्यंत दमलेला हा तरुण नवीन पुलाखाली वाहून आला आणि काही क्षण गायब झाला. त्यामुळे अनेकजण घाबरले होते. मात्र, नवीन पुलापासून काही अंतरावर तो पुन्हा दिसून आला आणि लांब अंतरावर किनाऱ्याला लागून तो बचावला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानुसार पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: The young man jumped into the Vashishti river which was overflowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.