शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

यंदा हापूस येणार उशिरा

By admin | Updated: October 10, 2015 23:50 IST

अवकाळी पाऊस : उत्पादकतेवर होणार परिणाम

रत्नागिरी :पावसाळा संपला असून, हिवाळा ऋतू सुरू होणार आहे. ऐन पावसाळ्यात ऊन्हाच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. एकूणच संमिश्र हवामानामुळे यंदाचे भातपीक धोक्यात आले आहे. तापमान ३४ ते ५५ अंश सेल्सियस असले तरी हवेत ९० टक्क्यापर्यंत बाष्प असल्याने नागरिक हैराण होत आहेत. हवामान खात्याने येत्या २४ तासात पावसाचा इशारा दिला आहे. एकूणच या संमिश्र हवामानामुळे आंबा उत्पादनावर परिणाम होणार आहे. एकूणच आंबा हंगाम लांबण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा तीव्र ऊन्हाच्या झळा अनुभवायला मिळत आहेत. परंतु, गेले दोन दिवस अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. आॅक्टोबर हीट सुरू होते, त्याचवेळी थंडीही सुरू होते. यावर्षी पाऊसच न झाल्यामुळे अद्याप किरकोळ स्वरूपात पालवी सुरू झाली आहे. पाऊस लागला तर पालवीसुध्दा वाढण्याची शक्यता आहे. सप्टेंबरपासून आंबा कलमांना पालवी सुरू होते. साधारणत: पालवी जुन होण्यासाठी ५५ ते ६० दिवस लागतात. जून, जुलैमध्ये कलमांना खते घालण्यात येतात. याच दरम्यान लवकर फळे येण्यासाठी कल्टारचाही वापर केला जातो. परंतु, यावर्षी पावसाची वाट पाहत काही शेतकऱ्यांनी कल्टार वापरलेच नाही. त्याचप्रमाणे घातलेली खते अद्याप कलमांना लागू पडलेली नाहीत. पावसाअभावी झाडांच्या मूळापर्यंत खत पोहोचलेलेच नाही. तीच अवस्था कल्टारची देखील आहे. त्यामुळे यावर्षीच्या आंबा हंगामाबद्दल उत्सुकता लागली आहे. पालवी कडक (जुन) झाल्याशिवाय मोहोर येत नाही. पावसाळा लांबला तर थंडी ऊशीरा सुरू होण्याची शक्यता आहे. एकूणच आंबा हंगामाला ऊशीर होण्याची शक्यता आहे. पाऊस कमी झाल्यामुळे थंडी कितपत पडेल याबाबत शंका आहे. ऐन पावसाळ्यात ऊन्हाळा अनुभवयास मिळाला आहे. गेले दोन दिवस हवामानात बदल झाला आहे. वारे वाहत आहेत. परंतु, शेतकरी देखील पाऊस पडून जाण्याची शक्यता वर्तवत आहेत. गतवर्षी चांगल्याप्रकारे मोहोर आला होता, इतकेच नव्हे तर चांगल्याप्रकारे फळधारणा झाली होती. परंतु, फेब्रुवारी, मार्चमध्ये झालेल्या अवेळीच्या पावसामुळे पीक वाया गेले. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये पाऊस पडण्याऐवजी आॅक्टोबरमध्ये पाऊस पडणे इष्ट ठरेल जेणेकरून आंब्याला पालवी येणे, पाला कडक होणे, मोहोर येण्याची प्रक्रिया सुरळीत होईल, असे बागायतदारांचा सूर दिसत आहे. (प्रतिनिधी)