शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

संगमेश्वरची पाणीपातळी घटली

By admin | Updated: May 21, 2015 00:08 IST

पंचायत समिती : १६ गावातील ९ वाड्यांना पाणीटंचाईची झळ

देवरुख : वाढत्या उष्णतेमुळे संगमेश्वर तालुक्यात पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. तसेच पाण्याचे स्रोतही आटू लागल्याने तालुक्यात पाणीटंचाई तीव्र होत आहे. सध्या १६ गावांतील ९ वाड्यांना पाण्याची तीव्रता भासू लागली असून, त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तालुक्यातील १७ गावे आणि २३ वाड्यांना पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. तालुक्यात यावर्षी पहिला टँकर एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरु झाला. मात्र, पाणीटंचाईची झळ मार्च अखेरपासूनच चालू झाली होती. आता पाणीटंचाईची ही भीषणता दिवसागणीक वाढत आहे. १६ गावांतील २२ वाड्यांसाठी केवळ तीन टँकर तहान भागवण्यासाठी धावत आहेत.पाणीटंचाईग्रस्त वाड्यांची संख्या आणि वाढत्या उन्हाचा विचार करता किमान ४-५ टँकरची आवश्यकता आहे. मात्र, सध्या तीन टँकर्सवरच काम रेटून नेले जात आहे. या तीन टँकरमध्ये २ शासकीय व १ खासगी टँकरचा समावेश आहे. यापलिकडे काही गावांना पाणीटंचाई भासत आहे. मात्र त्या गावांनी टँकरची मागणी अद्याप केलेली नाही. त्यामुळे त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.कडवई घोसाळकरकोंड, पुर्येतर्फे देवळे, चव्हाणवाडी, बेलारी माचीवाडी, फुणगूस घडशीवाडी, धामापूरतर्फ देवरुख, पाचांबे, नेदरवाडी, दखीणपेठ, मेढे, निवळी धनगरवाडी, असुर्डेतील भिरकोंड, साखळकोंड, रांगवमधील गवळवाडी, धनगरवडी, शेनवडे, गवळवाडी तसेच सायले बौद्धवाडी, राजिवली येडगेवाडी, मधलीवाडी या गावांचा आणि वाड्यांचा पाणीटंचाईग्रस्तांमध्ये समावेश आहे.याखेरीज अजूनही काही गावांना पाणीटंचाई भेडसावू लागली आहे. त्यांनी टँकरसाठी मागणी नोंदवली आहे. तालुक्यातील तांबेडी - धनगरवाडीतही टँकरची मागणी होत आहे. प्रस्ताव तयार झाला असून, पाहाणीनंतर गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. यावर्षी उन्हाचा पारा अधिकच वाढत असून, नागरिक पुरते हैराण झाले आहेत. (प्रतिनिधी)