शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

खेडच्या ३४ उपकेंद्रांना प्रसुतिगृहाची प्रतीक्षाच!

By admin | Updated: August 24, 2015 23:25 IST

महिलांची गैरसोय : निधी असूनही जागेअभावी प्रस्ताव रखडले

दिनकर चव्हाण ल्ल आंबवली खेड तालुक्यातील ४८ आरोग्य उपकेंद्रांमध्ये सध्या आरोग्यविषयक शिबिरे घेतली जात आहेत. या ४८ उपकेंद्रांपैकी १४ उपकेंद्रांमध्ये प्रसुतिगृह बांधण्यात आली आहेत, तर उर्वरित ३४ केंद्रांमध्ये प्रसृतिगृह नसल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे गरोदर महिलांची गैरसोय होत आहे. १४ उपकेंद्रांमध्ये कक्षाची सोय आहे़ मात्र, उपकेंद्रांकडील जागेअभावी प्रसुतिगृह रखडली असल्याचे सांगण्यात येत आहे. या उपकेंद्रांमध्ये आवश्यक सोयी सुविधांचा थांगपत्ताच नसल्याने गरोदर मातांची हेळसांड होत आहे. गावापासून प्राथमिक केंद्राचे अंतर लांब असल्याने दूर अंतरावर गरोदर मातेला नेणे अशक्य होत आहे. त्यामुळे आरोग्य उपकेंद्रामध्ये प्रसुतीची व्यवस्था सरकारकडून करण्यात आली आहे. त्याकरिता प्रसुती केंद्राच्या प्रत्येक इमारतीत प्रसुतिगृहाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, तालुक्यात ४८ उपकेंद्र असून, त्यापैकी केवळ १४ केंद्रामध्ये या उपकेंद्रांच्या इमारतीत प्रसुती कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. यातील तळवटपाल व चोरवणे या दोन केंद्रांमध्ये कक्षाची सुविधा आहे. मात्र, तेथे वीज आणि पाण्याची सुविधा नसल्याची बाब समोर आली आहे. उपकेंद्रांच्या परिसरात तसेच काही प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात आजारी असलेल्या व्यक्तीला दवाखान्यात आणण्यासाठी अजूनही रस्त्यांची सुविधा नाही, ही बाब गंभीर आहे़ त्यामुळे काही केंद्रांमध्ये कक्षाकरिता जागा नसल्याने ग्रामीण भागातील गरोदर महिलांना गैरसोयीला सामोर जावे लागत आहे़ बालमृत्यू व मातामृत्यू यांच्या जीविताला असणारा धोका टाळण्याकरिता शासनाकडून तसेच आरोग्य विभागाकडून प्रत्येक महिलेची प्रसुती रूग्णालयातच व्हावी, यासाठी जनजागृती केली जात आहे. अलिकडच्या काळात रूग्णालयात प्रसुतीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश गरोदर माता स्वत:हून प्रसुतीसाठी रूग्णालयात दाखल होतात. प्रसुतिगृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध होत असला तरी तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रांकडे जागा उपलब्ध नसल्याने कक्षाची व उपकेंद्रांची उभारणी करणे अशक्य झाले आहे. कक्ष उभारणीसाठी त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी आता ग्रामीण भागात विशेषकरून महिलावर्गातून केली जात आहे, याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.