नियमांचे उल्लंघन; दुकानदार कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST2021-06-02T04:24:15+5:302021-06-02T04:24:15+5:30

रत्नागिरी : नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडल्याप्रकरणी ५ दुकानदारांवर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ...

Violation of rules; Shopkeepers in controversy | नियमांचे उल्लंघन; दुकानदार कचाट्यात

नियमांचे उल्लंघन; दुकानदार कचाट्यात

रत्नागिरी : नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडल्याप्रकरणी ५ दुकानदारांवर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार, ३१ मे रोजी रत्नागिरी शहरातील धनजीनाका, स्टॅण्ड परिसरात करण्यात आली.

नजीर बावानी (४९, रा. उद्यमनगर, रत्नागिरी), मोहम्मद बावानी (५५, रा. ओसवाल नगर), आरिफ फजलानी (रा. थिबापॅलेस), प्रशांत पोवार (रा. प्रथमेश कॉम्प्लेक्स, स्टॅण्डसमोर), दिलीप गांधी (रा. स्टॅण्डसमोर) अशी गुन्हा दाखल केलेल्या दुकानदारांची नावे आहेत. या सर्वांनी ब्रेक द चेन या लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करत आपली दुकाने उघडली होती. अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत.

लाॅकडाऊनच्या काळात प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पाेलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Violation of rules; Shopkeepers in controversy