लसीकरण केवळ ३५ टक्के; नवे जिल्हाधिकारी यांच्यासमोर कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याचे मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST2021-07-18T04:22:44+5:302021-07-18T04:22:44+5:30

जिल्ह्यात लसीकरणासाठी पात्र असलेल्या १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या सुमारे १३ लाख १५ हजार १८६ इतकी आहे. यापैकी आतापर्यंत एकूण ...

Vaccination only 35%; The big challenge for the new collector is to stop the third wave of corona | लसीकरण केवळ ३५ टक्के; नवे जिल्हाधिकारी यांच्यासमोर कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याचे मोठे आव्हान

लसीकरण केवळ ३५ टक्के; नवे जिल्हाधिकारी यांच्यासमोर कोरोनाची तिसरी लाट थोपविण्याचे मोठे आव्हान

जिल्ह्यात लसीकरणासाठी पात्र असलेल्या १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या सुमारे १३ लाख १५ हजार १८६ इतकी आहे. यापैकी आतापर्यंत एकूण लसीकरण ४,६५,१२२ (३५.३७ टक्के) इतके झाले आहे. त्यापैकी पहिला डोस ३,६८,०८० (३० टक्के) नागरिकांनी घेतला आहे आणि दुसरा डोस केवळ ९७,०४२ (७.३८ टक्के) नागरिकांना मिळाला आहे.

जिल्ह्याला अजूनही लसचा पुरवठा म्हणावा तसा सुरू झालेला नाही. त्यामुळे १८ ते ४४, ४५ ते ५९ आणि ६० वर्षांवरील नागरिकांना अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. पहिला डोस अजूनही ७२ टक्के लोकांनाही मिळालेला नाही. त्यातच पहिला घेऊन दुसऱ्या डोसची मुदत टळून गेली तरीही दुसरा डोस अजूनही ९२ टक्के लोकांना मिळालेला नाही. त्यामुळे ज्यांना पहिला डोस मिळालेला नाही, तेही काळजीत आहेत तर ज्यांना दुसरा डोस अजूनही मिळालेला नाही, ते कधी मिळणार, याची प्रतीक्षा करत आहेत.

जागतिक आरोग्य स्तरावरील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत असलेल्या अंदाजानुसार, सप्टेंबर-ऑक्टाेबर महिन्याच्या कालावधीत देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त होत आहे. त्याआधी कोरोनापासून सुरक्षित करण्याच्या दृष्टीने किमान पहिला डोस तरी १०० टक्के नागरिकांना मिळणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्याचा विचार करता केवळ ३० टक्के लोकांनाच आतापर्यंत पहिला डोस मिळाला आहे. उर्वरितांचे काय? त्याचप्रमाणे दोन्ही डोस घेतलेले जेमतेम साडे सात टक्के आहेत. त्यामुळे अजूनही ९२ टक्के लोकांपर्यंत दुसरा डोस पोहोचविणे, हे मोठे आव्हानच आहे.

एकंदरीत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डाॅ. बी. एन. पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वीही अनेक जिल्ह्यांत प्रशासकीय कामांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यामुळे लसीकरणाचे शिवधनुष्य पेलण्यासाठी ते कशाप्रकारे नियोजन करणार, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण लसीकरण : ४,६५,१२२

पात्र लाभार्थी : १३ लाख १५ हजार १८६

पहिला डोस घेतलेले : ३,६८,०८० (३० टक्के)

दोन्ही डोस घेतलेले : ९७,०४२९ (७.३८ टक्के)

१८ ते ४४ वयोगट एकूण लसीकरण : १,५८,१६४ (२५.३७ टक्के)

पहिला डोस : ६९,५२२ (११.१५ टक्के)

दोन्ही डोस : ११,४३१ (१.८३ टक्के)

४५ ते ५९ वयोगटातील एकूण लसीकरण : १,६६,३४७

पहिला डोस : १,१४,८०६ (३६.३६ टक्के)

दोन्ही डोस : २६,३९८ (६.६० टक्के)

६०वरील एकूण लसीकरण : १,४०,६११ (४६.३६ टक्के)

पहिला डोस : ९५,७१३ (३१.५८ टक्के)

दोन्ही डोस : २७,२११ (८.९७ टक्के)

Web Title: Vaccination only 35%; The big challenge for the new collector is to stop the third wave of corona