आंजर्लेत लसीकरण केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST2021-04-24T04:31:39+5:302021-04-24T04:31:39+5:30

दापोली : कोविडचा प्रादुर्भाव दापोली तालुक्यात वाढत असल्याने त्याचा आढावा घेण्यासाठी दापोली दौऱ्यावर आलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ...

Vaccination center started in Anjarle | आंजर्लेत लसीकरण केंद्र सुरू

आंजर्लेत लसीकरण केंद्र सुरू

दापोली : कोविडचा प्रादुर्भाव दापोली तालुक्यात वाढत असल्याने त्याचा आढावा घेण्यासाठी दापोली दौऱ्यावर आलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आढावा सभेनंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशिष मरकड यांना आंजर्ले येथील प्राथमिक शाळेत कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आंजर्ले येथे गुरुवारपासून लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

आंजर्ले येथे गुरुवारी या लसीकरण केंद्राचे उद्घाटन आंजर्ले सरपंच स्वप्नाली पालशेतकर, उपसरपंच मंगेश महाडिक, संदेश देवकर, आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद मोहिते, सर्व आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मोडणारे सुमारे ३५ गावांची गैरसोय लसीकरण केंद्र सुरू करून दूर झाली आहे. यापूर्वी या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोडणाऱ्या ३५ गावांना लसीकरणासाठी पदरमोड करून केळशी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागत होते. आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू असल्याने या ठिकाणी लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आली होती; परंतु ही बाब पत्रकारांनी उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या लक्षात आणून देताच आंजर्ले येथील लसीकरण केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी सूचना करण्यात आली हाेती.

Web Title: Vaccination center started in Anjarle