शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात ४,१०० लोकांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST

राजापूर : शहरातील तब्बल ४,१०० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, ५ जूनपासून नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रभागनिहाय लसीकरण ...

राजापूर : शहरातील तब्बल ४,१०० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, ५ जूनपासून नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेत सुमारे १,०५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, शहरात सध्या कोरोनाचे २३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.

मोफत रोपे वाटप

देवरुख : पांगरी ग्रामपंचायतीमधील पदाधिकाऱ्यांनी प्रदूषणाचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी वृक्षलागवड, वृक्ष संवर्धनाची धडक मोहीम हाती घेतली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात प्रत्येक कुटुंबाला रोपांचे मोफत वाटप करून संवर्धनाची जबाबदारी संबंधितांवर सोपविण्यात आली आहे.

पूल वाहतुकीसाठी खुला

रत्नागिरी : रत्नागिरी कोस्ट गार्डने विमानतळाचे काम हाती घेतल्यानंतर या परिसरातून जाणारा रस्ता आणि पाण्याची पाइपलाइन मुंबई उपकेंद्राच्या समोरून वळविण्यात आली. तसेच त्या ठिाकाणचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

फगरवठार येथील रस्ता सुरळीत

रत्नागिरी : शहरातील खालचा फगरवठार येथे तीव्र उतारावर आंब्याचे झाड पडल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला होता. तसेच महावितरणचेही मोठे नुकसान झाले. उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांच्या प्रयत्नाने हे आंब्याचे झाड हटविण्यात आल्याने रस्ता सुरळीत सुरू झाला.

मिरकरवाडा येथील कार्यालयाची दुरवस्था

रत्नागिरी : शहरातील मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, मिरकरवाडा येथील कार्यालय पूर्णपणे जीर्ण झाले आहे. ते कधीही कोसळू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याकडे मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी मच्छीमारांकडून पुढे येत आहे.

पेन्शनची कामे रखडली

राजापूर : तालुक्यातील वाटूळ येथील पोस्ट कार्यालयातील इंटरनेट सुविधा गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने या कार्यालयाचा कारभार ठप्प झाला आहे. यामुळे लाेकांच्या ठेवी भरणे, काढणे, संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन व पोस्टातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची कामे रखडरली आहेत.

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

राजापूर : तालुक्यात रुग्णवाहिकांची कमतरता असताना बंद पडणाऱ्या रुग्णवाहिका दुरुस्तीकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. राजापूर तालुका आरोग्य विभागाची रुग्णवाहिका नादुरुस्त झाली असल्याने पांगरे येथे बेवारस स्थितीत अनेक दिवस ठेवण्यात आलेली आहे.