शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

मग्रारोहयोच्या कार्यालयीन खर्चासाठी दमडीही नाही

By admin | Updated: December 29, 2014 23:35 IST

जिल्हा परिषद कक्षातील दूरध्वनी यंत्रणा बंद

रत्नागिरी : विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे़ मात्र, जिल्हा परिषदेतील कक्षाच्या कार्यालयीन खर्चासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेकडून वर्षभरात दमडीही दिलेली नाही़ त्यामुळे या योजनेचे काम करणाऱ्या जिल्ह्याच्या मुख्य कक्षाची अवस्था दिव्याखाली अंधार अशी झाली आहे.मग्रारोहयोच्या कामासाठी मजूर मिळत नसल्याने ही कामे सुरु झालेली नसल्याची ओरड प्रशासनाकडून सुरु आहे़ कोट्यवधी रुपयांचा निधी विनाखर्च पडून आहे़ मग्रारोहयोची जिल्हास्तर, तालुकास्तर आणि ग्रामस्तरावर कामे चालतात़ त्यासाठी जिल्हा परिषद कक्ष, पंचायत समिती कक्ष आणि ग्रामपंचायत कक्ष स्थापन करण्यात आली आहेत़ या योजनेच्या एकूण खर्चापैकी ०़१० टक्के खर्च कार्यालयीन कामासाठी करण्यात येतो़ त्यासाठी जिल्हा परिषद कक्ष ०़१० टक्के, पंचायत समिती कक्ष ०़१० टक्के आणि ग्रामपंचायत कक्षासाठी ०़५ टक्के खर्च करण्यात येतो़ कार्यालयीन खर्चासाठी जिल्हा प्रशासन आणि शासनाशी वेळोवेळी मागणी करुनही सप्टेंबर २०१३ पासून या तिन्ही कक्षांना एकही पैसा देण्यात आलेला नाही़ गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील विकासकामांवर मग्रारोहयोतून २ कोटी रुपये खर्च झाला आहे़ हे पाहता या कक्षाच्या खर्चासाठी २० हजार रुपये अनुदान मिळणे आवश्यक होते़ मात्र, या कक्षाला दमडी मिळालेली नाही़ त्यामुळे या कक्षातील दूरध्वनी सेवा गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहे़ तालुक्यात वा अन्य ठिकाणी या योजनेच्या कामासाठी कर्मचारी, अधिकारी स्वत:च्या मोबाईलचा वापर करीत आहेत़ त्यामुळे दूरध्वनी यंत्रणा कधी सुरु होईल, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़ दरम्यान, मग्रारोहयोच्या कामांसाठी निधीच मिळत नसल्याने ही कामे म्हणजे दिव्याखाली अंधार, अशी स्थिती झाली असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद वर्तुळातून उमटत आहे. (शहर वार्ताहर)मग्रारोहयोकडून कक्षाच्या खर्चासाठी अनुदान दिले जात नसल्याने या कक्षाने खास बाब म्हणून शासनाकडे २० हजार रुपये मागणी केली होती़ ते अनुदान शासनाकडून प्राप्त होऊन खर्चही झाले़