शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १९ वर्षांत पोलिओचा रुग्ण नाही

By admin | Updated: January 16, 2015 23:44 IST

तयारी पूर्ण : लसीकरण मोहीम

रत्नागिरी : पोलिओचे उच्चाटन करण्यासाठी १८ जानेवारी व २२ फेब्रुवारी २०१५ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी केले़ तसेच जिल्ह्यात गेल्या १९ वर्षांत एकही पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले़ पल्स पोलिओ लसीकरणाचा लाभ जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील १ लाख ४ हजार ४८५ मुलांना मिळणार आहे़ यासाठी जिल्ह्यामध्ये १९५८ लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत़ तसेच रेल्वे स्टेशन, बसस्थानक, आठवडा बाजार या ठिकाणी १४९ ट्रान्झीट टीम ठेवण्यात आलेल्या आहेत़ तसेच १५५ मोबाईल टीम ठेवण्यात आलेल्या आहेत़ या मोहिमेसाठी ४३०५ कर्मचाऱ्यांची लसीकरण केंद्रांवर नियुक्ती करण्यात आलेली आहे़ जिल्ह्यात ११५ वाहने अधिग्रहीत करण्यात आलेली आहेत़, असेही काळम-पाटील यांनी सांगितले़ पोलिओच्या विषाणूमुळे कायमचे अपंगत्व येते. हे विषाणू बराच काळ जिवंत राहतात़ अपंगत्त्वाची अनेक कारणे आहेत़ त्यापैकी पोलिओ हे एक कारण आहे़ म्हणून कर्मचाऱ्यांनी पल्स पोलिओ डोसचे काम शासकीय पध्दतीने न करता आपले मूल असल्याप्रमाणे करा, अशी सूचनाही काळम-पाटील यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे़ यावेळी एकही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी प्रत्येक पालकाने घ्यावी़ त्यासाठी प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ डोस द्यावा, असे आवाहन काळम-पाटील यांनी यावेळी केले़ यावेळी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ विनित फाळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ प्रल्हाद देवकर, माध्यम व प्रसिध्दी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी व अन्य उपस्थित होते़ (शहर वार्ताहर)