शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri news: सार्थक म्हणाला ‘साहेब, माझा बस पास हरवलाय, तक्रार द्यायची आहे’; विद्यार्थ्याचे केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 18:54 IST

पोलिसांनी अवघ्या पाच मिनिटांत एसटी पास हरवल्याचा दाखलाही त्याला तयार करुन दिला

संदीप बांद्रेचिपळूण : पोलिस स्थानकात जायचे म्हटल्यावर मोठ्या माणसांनाही घाम फुटतो; पण जेव्हा तेरा वर्षांचा चिमुरडा पोलिस स्थानकात जाऊन आपला बस पास हरवल्याची तक्रार करतो, तेव्हा ही गोष्ट कौतुकास्पद वाटते. चिपळूणच्या कापसाळ येथील सार्थक संजय जमदाडे याने हे धाडस केलं. एसटीचा पास हरवला म्हणून शुक्रवारी दुपारी तो तक्रार देण्यासाठी थेट पोलिस स्थानकात पोहोचला. अर्थात त्याच्या या वागण्याचे कौतुक वाटलेल्या पोलिसांनी अवघ्या पाच मिनिटांत एसटी पास हरवल्याचा दाखलाही त्याला तयार करुन दिला.पोलिस म्हणजे हातात काठी, करडा आवाज अशी प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. त्याविषयी लहान मुलांमध्ये प्रचंड भीती असते. बरीच मुलं रडलं किंवा एखादा हट्ट धरला, तर पालक पोलिसांचे नाव घेऊन वेळ मारून नेतात; परंतु या गोष्टीचा मुलांच्या मनावर लहानपणापासूनच परिणाम होतो. त्यातून पोलिसांविषयी भीती निर्माण होते. ही भीती आयुष्यभर राहते. त्यामुळे पोलिस स्थानकात जाऊन तक्रार देणे सोडा, अनेकजण पोलिस स्थानकात जाणेही टाळतात; परंतु नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन कोणतीही भीती न बाळगता पोलिसांपर्यंत यावे, यासाठी पोलिस प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे. त्याचे चांगले परिणाम आता हळूहळू होताना दिसत आहेत.शुक्रवारची घटनाही अशीच काहीशी होती. चिपळूण शहरालगतच्या कापसाळ येथील रहिवासी असलेल्या सार्थक संजय जमदाडे या १३ वर्षीय विद्यार्थ्याचा एसटी पास हरवला. त्यामुळे गडबडलेल्या सार्थकने थेट पोलिस स्थानक गाठले. पोलिस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर गेल्यानंतर मात्र तो गोंधळला. नेमके काय करावे हेच त्याला कळेनासे झाले. तेवढ्यात तो पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांच्या नजरेस पडला. त्यांनी जवळ बोलावून विचारपूस केली. तेव्हा त्याने घाबरत घाबरत माझा एसटी पास हरवला आहे. मला तक्रार द्यायची आहे, असे सांगितले.

तेव्हा शिंदे यांनी त्या चिमुरड्याला आपल्या कक्षात नेले आणि ठाणे अंमलदारांना बोलावून घेत अवघ्या पाच मिनिटांत त्याला एसटी पास हरवल्याचा दाखला दिला. त्यानंतर त्याला नवीन पास मिळवण्याची प्रक्रिया सांगितली. त्याचवेळी सार्थकचे कौतुक करत कोणीही न डगमगता पोलिसांची मदत घ्यावी, हेच आमचे ध्येय असल्याचा संदेश सोशल मीडियावरून दिला.

पोलिसांविषयी भीती मुळीच असता कामा नये. भीती आदरयुक्त असायला हवी. त्यासाठी पोलीस व नागरीक यांच्याच संवाद होण्याची गरज आहे. त्याच ध्येयाने आम्ही काम करीत आहोत. त्यामुळे या विध्यार्थ्याने कौतुक करावेसे वाटले. त्यातून आम्ही आमच्या प्रयत्नात यशस्वी होत असल्याची जाणीवही झाली. -रवींद्र शिंदे, पोलिस निरीक्षक, चिपळूण.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिसStudentविद्यार्थी