शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

आंबा उत्पादन कमीच, वाशीमधील विक्रेते प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:22 IST

रत्नागिरी : हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मोहर काळा पडून गळून गेला आहे. मेल ...

रत्नागिरी : हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा उत्पादनावर झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे मोहर काळा पडून गळून गेला आहे. मेल मोहराचे प्रमाण सर्वाधिक असल्यामुळे फळधारणा न झाल्याने यावर्षी जेमतेम १५ ते २० टक्केच आंबा उत्पादन झाले आहे. सद्यस्थितीत कोकणातून दिवसाला ४०० ते ५०० आंबा पेट्या विक्रीला वाशी बाजारात जात आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पेट्यांची संख्या केवळ १०० ते १५० इतकेच आहे.

यावर्षी नोव्हेंबरपर्यंत पाऊस लांबल्याने फुलोरा मोठ्या प्रमाणावर आला. परंतु, कडाक्याच्या थंडीमुळे आवश्यक फळधारणा झालीच नाही, शिवाय मोहर काळा पडला. या परिस्थितीमुळे खत व्यवस्थापनापासून मोहर, फळे वाचविण्यासाठी बागायतदारांनी केलेला खर्चही वाया गेला आहे. सुरुवातीच्या काळात आंबा पिकाचे प्रमाण कमी राहिल्याने बाजारात पुरेसा आंबा दाखल झाला नाही. 

हवामानातील बदलामुळे बहुतांश आंबा हा दि. २० मार्चपासूनच तयार होण्याची शक्यता आहे. नैसर्गिक बदलाचा परिणाम आंबा पिकावर हाेत असतानाच काही बागायतदारांनी माेठ्या कष्टाने हा आंबा वाचविला. हा तयार झालेला आंबा बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत आहे. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

वाशी बाजारात कोकणातून माेठ्या प्रमाणात हापूस आंबा विक्रीसाठी पाठविण्यात येताे. मात्र, यावर्षी उत्पादनच कमी झाल्याने वाशी बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या आंब्याचे प्रमाण कमी आहे. सध्या ४०० ते ५०० पेट्या वाशीला जात असून, त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील अवघ्या १०० ते १५० पेट्यांचा समावेश आहे. त्या तुलनेने तामिळनाडू राज्यातून हापूस, बदामी, लालबा, नीलम, ताेतापुरी या प्रकारच्या आंब्याच्या ५००० पेट्या वाशी बाजारात येत आहेत. तामिळनाडूच्या तुलनेत कोकणातील आवक अत्यल्प आहे.

सहा ते दहा हजार रूपये दर

सध्या आवक कमी असल्यामुळे आंबा पेटीला सहा ते दहा हजार रूपये दर मिळत आहे. यावर्षी आंबा उत्पादनच कमी असल्यामुळे दर टिकून राहतील, असे सांगण्यात येत आहे.

गतवर्षी आवक जास्त दर कमी

गतवर्षी याच हंगामात कोकणातून दिवसाला ४ ते ५ हजार पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात येत असत. यावर्षी ते प्रमाण ४०० ते ५०० पेट्या इतकेच आहे. गतवर्षी पेटीला २ ते ६ हजार रूपये दर मिळत होता, यावर्षी आवक कमी असल्यामुळे ६ ते १० हजार रूपये दर मिळत आहे.

यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा उत्पादनच कमी आहे. त्यामुळे बाजारपेठेतील आवक मंदावली आहे. गुढीपाडव्यानंतर आवक वाढेल. परंतु, दरवर्षीपेक्षा यावर्षी आंबाच कमी असल्यामुळे प्रमाण कमी असेल. उत्पादन कमी असल्यामुळे दर टिकण्याची शक्यता आहे. - संजय पानसरे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती नवी मुंबई.

English
हिंदी सारांश
Web Title : Low Mango Production: Vashi Market Vendors Await Supplies

Web Summary : Erratic weather slashed mango yields to 15-20%. Ratnagiri sends few boxes to Vashi. Tamil Nadu dominates the market. Prices are high, ₹6,000-₹10,000/box, due to scarcity, unlike last year's higher supply and lower rates. Limited supply impacts Vashi arrivals.