Ratnagiri: विद्यार्थिनीशी गैरकृत्य करणाऱ्या शिक्षकाचे निलंबन

By मेहरून नाकाडे | Updated: January 13, 2025 16:03 IST2025-01-13T16:02:35+5:302025-01-13T16:03:08+5:30

रत्नागिरी : शहरातील बसस्थानकाच्या परिसरातील एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरकृत्य केल्याची घटना घडली. विद्यार्थिनीने पालकांना याबाबत सांगताच पालकांनी शाळेत ...

Teacher suspended for misbehaving with student in Ratnagiri | Ratnagiri: विद्यार्थिनीशी गैरकृत्य करणाऱ्या शिक्षकाचे निलंबन

Ratnagiri: विद्यार्थिनीशी गैरकृत्य करणाऱ्या शिक्षकाचे निलंबन

रत्नागिरी : शहरातील बसस्थानकाच्या परिसरातील एका शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरकृत्य केल्याची घटना घडली. विद्यार्थिनीने पालकांना याबाबत सांगताच पालकांनी शाळेत येवून संबंधित शिक्षकाला मारहाण केली. संबंधित घटना समजतातच संस्थेच्या पदाधिकारी शाळेत दाखल झाले, त्यांनी तातडीने शिक्षकाचे निलंबन केले असल्याचे सांगितले.

प्रथमेश नवेले नामक शिक्षकाने मुलीशी गैरकृत्य केल्याचे समजताच पालक संतप्त झाले. शाळेत येवून शिक्षकांला मारहाण केली. पालक मारहाण करीत असताना, शाळेचा एक शिपाई याने संतप्त होत पालकांना मारहाण केली असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित प्रकारामुळे शाळेच्या आवारात एकच गर्दी झाली. घटना समजताच पोलिस दाखल झाले, त्यांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेतले असून  मुलीसह पालकांनाही अधिक चाैकशीसाठी पोलिस स्थानकात नेले.

घटनेनंतर संस्थेचे पदाधिकारी, नियामक मंडळाचे सदस्य शाळेत हजर झाले. शाळेत आजपर्यत अशोभनिय कृत्य घडलेले नाही, त्यामुळे संबंधित गैरकृत्य करणाऱ्या शिक्षकाला पाठिशी न घालता तातडीने निलंबन करत असल्याचे जाहीर केले. संबंधित घटनेबाबत चाैकशी करण्यात येणार आहे. शिपायाचीही चाैकशी करणार असून आरोपात तथ्य आढळले तर योग्य कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Teacher suspended for misbehaving with student in Ratnagiri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.