शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

तालुके नऊ, बंब फक्त सहाच..

By admin | Updated: February 1, 2015 00:48 IST

दखलपात्र विषय बेदखल : लांजा, गुहागर, मंडणगडची सुरक्षा ऐरणीवर

रत्नागिरी : जिल्ह्यात नऊ तालुके असले, तर आपत्कालीन संकटाच्या निवारणासाठी शासकीय अग्निशमन बंबांची संख्या केवळ सहाच आहे. पाच नगरपरिषदांकडेच सहा बंब असून, संगमेश्वर, लांजा, मंडणगड, गुहागर हे तालुके या सुविधेपासून वंचितच आहेत. यावरून आपत्कालीन सुरक्षा यंत्रणा सुरक्षितेबाबत बेदखल असल्याचे दिसून येत आहे. दापोली तालुक्यातील हर्णै येथे घडलेल्या आगीच्या दुर्घटनेमुळे हा विषय पुन्हा एकदा पुढे आला आहे. मात्र जिल्ह्यातील उदासीन राजकीय लोकप्रतिनिधींना अजूनही या विषयाचे गांभीर्य समजलेले नाही. आगीची घटना घडल्यानंतर त्यावर चर्चा होते. पण पुढे कोणतीच हालचाल होत नाही, असे दुर्दैवी चित्र आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा विस्तार वेगाने होत आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचे प्रमुख ठिकाण असलेल्या शहरांचाही विस्तार वेगाने होत आहे. आजूबाजुचा परिसरही विकसित होत आहे. जिल्ह्यात रत्नागिरी आणि चिपळूणनजीक लोटे येथे औद्योगिक वसाहतही विस्तारलेली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी आग लागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. उन्हाळ्यात वणव्यासारख्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. यातून होणारे नुकसानही काही वेळा लक्षणीय असते. रत्नागिरी शहरात रासायनिक उद्योगांचे प्रमाण नगण्य असले, तरी लोटे एम. आय. डी. सी. भागात रासायनिक कारखाने आहेत. यापूर्वी काही भागात तसेच महामार्गावर आगीच्या तसेच वायू गळतीच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, या आपत्कालीन घटनांचा सामना करण्यासाठी आवश्यक तेवढी अग्निशमन बंबाची संख्या नसल्याने अनेकदा भीषण परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर, खेड, चिपळूण या चार नगरपरिषदा आणि दापोली नगरपंचायतीकडे स्वत:ची अग्निशामक यंत्रणा कार्यरत आहे. चिपळूणला दोन अग्निशमन बंब आहेत. मात्र, ही यंत्रणा पुरेशी नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले. संगमेश्वर, लांजा, गुहागर आणि मंडणगड या तालुक्यांकडे तर ही यंत्रणाच नाही. आपत्कालीन परिस्थितीत नजिकच्या तालुक्याचा आधार घेऊन बंबाची मागणी करावी लागते. यासाठी वेळही बराच लागतो. शहराच्या विस्ताराबरोबरच विकासाचीही प्रक्रिया होत असल्याने, आपत्कालीन परिस्थितीत केवळ एकच बंब अपुरा पडतो. परिणामी अशी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास खासगी कंपन्यांच्या सुरक्षायंत्रणेचा आधार घ्यावा लागतो. रत्नागिरी परिसरात अशी घटना घडल्यास नजीकच्या फिनोलेक्स व जिंदाल कंपनीच्या बंबांची गरज भासते. चिपळूणातही काही वेळा नगरपरिषदेचे दोन बंब अपुरे पडतात. त्यामुळे, येथील एमआयडीसी आणि खासगी कंपन्यांकडील अग्निशमन यंत्रणेचा आधार घ्यावा लागतो, हे दुर्दैव आहे. (प्रतिनिधी)