शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

Cyclone Nisarga: वादळी वाऱ्याचा रत्नागिरी जिल्ह्याला तडाखा, ठिकठिकाणी झाडं कोसळुन नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 14:00 IST

रत्नागिरी किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचे आगमन झाले असून सध्या मोठ्या प्रमाणावर  जोरदार पावसासह प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच वेगाने वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह खंडीत झाला आहे.

ठळक मुद्देवादळी वाऱ्याचा रत्नागिरी जिल्ह्याला तडाखा, ठिकठिकाणी झाडं कोसळुन नुकसानरत्नागिरीत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस; विद्युत प्रवाह खंडीत

रत्नागिरी : रत्नागिरी किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळाचे आगमन झाले असून सध्या मोठ्या प्रमाणावर  जोरदार पावसासह प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच वेगाने वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह खंडीत झाला आहे.जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरु असून खबरदारी म्हणून महावितरणने विज पुरवठा खंडित केला आहे.

वादळी वाऱ्याने रत्नागिरी, गणपतीपुळे, भोके, दापोली, संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरीत रस्त्यावरील भली मोठी होर्डिंग्स वाऱ्याने रस्त्यावर कोसळली आहेत.जिल्ह्यातील वाऱ्याचा वेग वाढत निघाला असून नागरिकांनी कोणत्याही करणासाठी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.देवरुख आणि संगमेश्वरात झाडं कोसळून नुकसाननिसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर वाहत असलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे संगमेश्वरजवळच्या डिंगणी कोंडवीवाडीतील ग्रामस्थ राजाराम खांबे यांच्या घरावर झाड पडून घराचे मोठे नुकसान झाले आहे, जैतापूर आगरवाडी येथील धोंडु धुळाजी पंगेरकर यांच्या घराचे, पडवीचे नुकसान झाले आहे, तर देवरुख जवळच्या हरपुडे मराठवाडी येथील श्री केदारेश्वर मंदिरालगत असलेल्या गायकवाड यांच्या घरासमोरील फणसाचे झाड विजेच्या खांबावर कोसळल्याने विजेच्या तारा तुटल्या आहेत. सुदैवाने विज पुरवठा खंडित असल्याने दुर्घटना घडली नाही. तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड झाली आहे मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

टॅग्स :cycloneचक्रीवादळRatnagiriरत्नागिरी