शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

जिल्हा रूग्णालयातील विश्रांतीगृहाचे काम सुरु करा : अनिल परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 1:26 PM

रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ६५ लाख रुपये खर्चून विश्रांतीघर बांधण्याच्या कामाला मंजुरी प्राप्त झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करुन कामाला सुरुवात करा, असे निर्देश परिवहन, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी दिले.

ठळक मुद्देजिल्हा रूग्णालयातील विश्रांतीगृहाचे काम सुरु करा : अनिल परबपालकमंत्र्यांची जिल्हा रुग्णालयास भेट

रत्नागिरी : रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ६५ लाख रुपये खर्चून विश्रांतीघर बांधण्याच्या कामाला मंजुरी प्राप्त झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव त्वरित सादर करुन कामाला सुरुवात करा, असे निर्देश परिवहन, संसदीय कार्य मंत्री तथा पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी दिले.पालकमंत्री झाल्यानंतरच्या आपल्या पहिल्या रत्नागिरी दौऱ्यात त्यांनी सोमवारी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमन राजन साळवी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बघाटे उपस्थित होते समवेत होते.छोट्या छोट्या कारणांवरुन रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागू नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. रुग्णालय हा जिल्ह्याचा आत्मा असतो. या भूमिकेतून सुविधा दिल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.

रुग्णालय स्वच्छतेबाबत मिळालेल्या तक्रारींबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. या भेटीत त्यांनी आंतररुग्ण विभाग, आयसोलेशन वॉर्ड आणि डायलिसीस विभाग यांच्यासह अनेक विभागांना भेट देऊन पाहणी केली.स्थानिक स्तरावर दुरुस्ती व इतर कामे यासाठी नियोजन निधीतून पैसे देण्यात येतील असे सांगून ते म्हणाले की, रिक्त पदांची समस्या तसेच औषध खरेदीसाठी कमी पडणारा निधी आदि बाबींसाठी मुंबईत अधिकाऱ्यांची तसेच आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊ आणि बैठकीतून समस्या सोडवू असेही, ते म्हणाले. याबाबत १० दिवसात आपणास अवगत करावे, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल बोल्डे यांनी पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. रुग्णालयाच्या गरजा आणि समस्या यांचीही माहिती त्यांनी यावेळी पालकमंत्र्यांना दिली. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरीAnil Parabअनिल परब