शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

‘रॉयल’बाबत विधानसभेत तारांकित प्रश्न

By admin | Updated: July 24, 2015 00:42 IST

गुहागर तालुका : माहिती मागवल्याने महसूलची धावपळ

गुहागर : शृंगारतळी बाजारपेठेमधील अनधिकृत बांधकाम केलेल्या रॉयल अपार्टमेंटबाबत पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार भास्कर जाधव यांनी तारांकित प्रश्न केल्याने महसूल खात्याची चांगलीच धावपळ उडाली आहे. जिल्हाधिऱ्यांनी गुहागर महसूल प्रशासन व निबंधक कार्यालयाकडून माहिती मागवली आहे.शृंगारतळी येथे रॉयल अपार्टमेंटमध्ये दोन इमारतीमधील एकाच इमारतीसाठी अधिकृत टाऊन प्लॅनिंगची परवानगी घेतली असताना दोन इमारतीमधील रुम विकताना व आवश्यक परवानगी घेताना निबंधक कार्यालयाकडे खरेदीखत व्यवहारासाठी एकच एनए आॅर्डर जोडून संबंधित इमारतमालकाने महसूल व निबंधक कार्यालयाची फसवणूक केली. याबाबत विकत घेतलेल्या सदनिकाधारक व इमारत मालक यांच्यामध्ये सांडपाण्याची सुविधा व शौचालय टाकीवरुन वाद वाढून यामधून एक इमारत चुकीच्या पद्धतीने अनधिकृत असल्याची माहिती पुढे आली आहे.याबाबत सदनिकाधारक इम्रान घारे व इतर सहकाऱ्यांनी हा विषय महसूल व पंचायत समित प्रशासनाकडे गेली काही महिने लावून धरला होता. स्थानिक ग्रामपंचायत मात्र याबाबत कोणतेच सहकार्य करत नव्हती. अशावेळी आमदार भास्कर जाधव यांच्याकडे हा विषय मांडल्यावर पावसाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न केला. यातून आता महसूल प्रशासन निबंधक कार्यालय व ग्रामपंचायतीकडून या इमारतीसाठी दिलेल्या परवानग्या योग्य की अयोग्य याबाबत सखोल चौकशी सुरु झाली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार तडवी, मंडळ अधिकारी व मुख्य लिपिक यांना तातडीने बोलावून सर्व आढावा घेतला जात आहे. यामध्ये जिल्हाधिकारी काय आदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. याबाबत सदनिधारकांनी महसूल व पंचायत समिती प्रशासनाकडे प्रश्न लावून धरला होता. आता जाधव यांनी त्यात लक्ष घातले आहे. (प्रतिनिधी)