शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची दुसरी लाट महिनाभरात संपविण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करणार : डाॅ. बी.एन. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST

रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी करणे गरजेचे आहे. महिनाभरात दुसरी लाट संपविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचा संकल्प ...

रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी करणे गरजेचे आहे. महिनाभरात दुसरी लाट संपविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचा संकल्प रत्नागिरीचे नवीन जिल्हाधिकारी डाॅ. बी.एन. पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ते म्हणाले, रत्नागिरीत दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरणात वाढ आणि पाॅझिटिव्हिटी कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाला सोबत घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी वाॅर रूम तयार करून चर्चा करणार. दर दिवशी कोरोनाच्या १० हजार चाचण्या करण्यावर भर देणार. यासाठी आरटीपीसीआरवर अधिक भर देणार. अत्यावश्यक असेल तेथेच ॲंटिजन करणार. सध्या आरटीपीसीआर १००० पर्यंत होतात, त्या दरदिवशी २५०० पर्यंत वाढविण्याचा प्रयत्न करणार. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ग्रामीण आरोग्य केंद्रांत चाचण्या होणार असून दररोज याबाबतचा आढावा घेतला जाईल, अशी माहितीही जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी दिली.

काॅन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर देणार असून त्यासाठी हाय रिस्क आणि लो रिस्क असे दोन विभाग करणार, डेरवण येथील खासगी मेडिकल कॉलेजला हजार चाचण्या करते, त्यांनाही परवानगी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझे गाव कोरोनामुक्त गाव ही योजना कोरोना हाॅटस्पाॅट गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या सहकार्याने प्रभावीपणे राबविणार. रत्नागिरी जिल्ह्यातील गावे जास्तीत जास्त कोरोनामुक्तीची बक्षिसे जिंकतील, यासाठी प्रयत्न करणार. लोकांमध्ये याबाबत जागृती झाली तरच कोरोनाची दुसरी लाट कमी होईल, असे ते म्हणाले. पर्यटकांची तसेच सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्यांची सक्तीची चाचणी करण्यात येणार असल्याचे डाॅ. पाटील यांनी सांगितले.

...............

अर्थचक्र सुरू करणार...

कोरोनाकाळात उद्योग बंद राहिले आहेत. अर्थचक्र सुरू होण्याच्या दृष्टीने कोरोनाचे नियम पाळून ९२८ पैकी बंद असलेले ३०० उद्योग सुरू करण्याचे प्रयत्न करणार. त्यासाठी मायक्रो प्लॅन बनवून दिला आहे. ८५०० पैकी ७००० कामगारांच्या चाचण्या झाल्या असून ७६०० लोकांचे लसीकरण झाले आहे.

विविध टुरिझम प्लान बनविणार...

कोकणात टुरिझम महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने कोस्टल आणि नाॅन कोस्टल असे वेगवेगळ्या प्रकारचे प्लान बनविणार. सिंधुरत्न प्रोजेक्टची अंमलबजावणी तसेच फळबाग लागवडीवर भर देणार आहे. एअरपोर्टचे राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. पाटील यांनी सांगितले.