शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

‘रोजगार हमी’ची दुसरी इनिंग सुरू

By admin | Updated: September 24, 2015 00:11 IST

रत्नागिरी जिल्हा : ५४१ हेक्टरचे उद्दिष्ट

रत्नागिरी : गेली दोन वर्षे रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजना बंद करण्यात आली होती. रोहयोऐवजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली. मात्र, या योजनेतील जाचक अटीमुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद न लाभल्यामुळे शासनाने पुन्हा यावर्षी ‘रोजगार हमी योजनेला’ मान्यता दिली आहे. जिल्ह्यासाठी ५४१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीस मान्यता देण्यात आली आहे.सन १९९० पूर्वी जिल्ह्यात फळबाग लागवडीखालील क्षेत्र ३८,६४४ हेक्टर होते. मात्र, रोहयोअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाच्या माध्यमातून २०१२-१३पर्यंत जिल्ह्यात १ लाख २६ हजार २७५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली, त्यामुळे १ लाख ६२ हजार ५४७ हेक्टर क्षेत्र फळबाग लागवडीखाली आले. परंतु २०१३ साली रोहयो योजना बंद करण्यात आली. त्याऐवजी मनरेगा सुरू करण्यात आली. मात्र, योजनेसाठी असलेल्या अटींमुळे शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. याबाबत ‘लोकमत’ने मालिका प्रसिध्द करून जिल्ह्यातील लागवड परिस्थितीवर प्रकाश टाकला होता. मात्र, पुन्हा शासनाने यावर्षी रोजगार हमी योजनेला मान्यता दिली आहे.रोहयोअंतर्गत लागवडीनंतर शेतकऱ्यांना सलग तीन वर्षे अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या बँकेच्या खात्यात थेट जमा होणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा सातबारा, आठ अ, व अर्ज आवश्यक आहे. मात्र, लागवडीसाठीची कलमे शासकीय नर्सरीतूनच विकत घेणे आवश्यक आहे. लागवडीसाठी १० हेक्टरची मर्यादा आहे. लागवडीनंतर अंतर्गत मशागत, खड्डे खोदणे, पाणी घालणे, मृत झाडांच्या ठिकाणी नवीन लागवड करणे, पीक संरक्षक खते देणे यासाठी सलग तन वर्षे पैसे देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी लागवडीसाठी, क्षेत्र तयार करण्यासाठी आधी स्वत:कडचे पैसे खर्च केल्यानंतर शासन मंजुरीप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे मिळत आहेत. २०१५-१६ वर्षासाठी जिल्ह्यात ५४१ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रोहयोअंतर्गत फळबाग लागवडीसाठी आंब्याकरिता ३००, काजू १८०, चिकू १०, नारळ १०, जांभूळ २, कोकम ३, फणस ३, सुपारी २, बांबू १, कातळ जमिनीतील आंबा लागवडीसाठी १०, भातखाचराच्या बांधावर आंबा लागवडीसाठी १० व नारळ लागवडीसाठी ५, नारळबागेतील मसाला पीक लागवडीअंतर्गत मिरी १, लवंग १, जायफळ १, सुपारी २ मिळून एकूण ५४१ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी मंडणगड तालुक्याला ४०, दापोली ७०, खेड ४०, चिपळूण ५०, गुहागर ७०, संगमेश्वर ६०, रत्नागिरी ९१, लांजा ७०, राजापूर तालुक्यात ५० हेक्टर क्षेत्र लागवडीसाठी लक्षांक देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)दोन वर्षे योजना बंदहवामान, रोजगार निर्मिती व उच्च मूल्यांकित पीक रचना या सर्व बाबींचा विचार यात करण्यात आला आहे. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्यासाठी तसेच पडिक जमिनीचा विकास करण्याच्या दृष्टीने रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड योजना सुरू करण्यात आली होती.