शहरं
Join us  
Trending Stories
1
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
2
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
3
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
4
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
5
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
6
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
7
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
8
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
9
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
10
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
11
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
12
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
13
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
14
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
15
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
16
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
17
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
18
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
19
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
20
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर सामसूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

गुहागर : लॉकडाऊन असले तरी सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, दूध, भाजी आदींसाठी विक्री सुरू आहे. मात्र, ...

गुहागर : लॉकडाऊन असले तरी सकाळी ७ ते ११ या वेळेत किराणा, दूध, भाजी आदींसाठी विक्री सुरू आहे. मात्र, त्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत घरपोच सेवेसाठी मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरात ही सर्व दुकाने ११ वाजता बंद झाल्यानंतर रस्त्यांवर सामसूम पसरलेली असते. ठरावीक वाहनेच सुरू असतात.

डोर्लेत काजू लागवड

रत्नागिरी : जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांच्या पुढाकारातून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जलद गतीने राबविण्यात येत होती. तालुक्यातील डोर्ले गावातही या योजनेचा लाभ घेऊन ७.२९ हेक्टर क्षेत्रावर आंबा काजू लागवड यशस्वी राबविण्यात आली असून, मजुरीपोटी दोन लाख रुपयांचे वितरण झाले आहे.

निराधार महिलांना वाटप

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील पुर्येचे उपसरपंच, तसेच काँग्रेस जिल्हा युवा उपाध्यक्ष संजू लोटणकर यांनी गरजू महिलांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे मानधनाचे वाटप केले. राज्य शासनाकडून उपसरपंचांना मिळणाऱ्या मानधनाची रक्कम लोटणकर यांनी या महिलांना दिली आहे. लाभार्थींनी लोटणकर यांना धन्यवाद दिले.

आंजर्लेत लसीकरण केंद्र

दापोली : दापोली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत येथील दौऱ्यावर आले असता त्यांनी आंजर्ले येथे कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता हे लसीकरण केंद्र सुरू झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मुंबईकरांचा धसका

लांजा : शिमगोत्सवात गावाला आलेल्या मुंबईकरांमुळे कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ झाली आहे. सध्या मुंबईत कोरोनाचे स्पॉट असल्याने पुन्हा मुुंबईकर चाकरमानी गावाला येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आधीच तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला असतानाच पुन्हा मुंबईकर गावी आले तर या भीतीने तालुकावासीय धास्तावले आहेत.

कामगारांवर संकट

राजापूर : सध्या शासनाने लॉकडाऊन जाहीर केले आहे. या कालावधीत सार्वजनिक बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अन्य बांधकामे बंद आहेत. या बांधकामांवर काम करणाऱ्या कामगारांच्या हातचे काम थांबल्याने पुन्हा या कामगारांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

कमाल तापमानात वाढ

रत्नागिरी : सध्या मळभी वातावरण कमी झाले असले तरी येत्या तीन ते चार दिवसांत कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे आता पुन्हा काही दिवस उन्हाच्या तीव्र झळांचा त्रास सोसावा लागणार आहे.