शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भिंगळाेलीतील ग्रामीण रुग्णालय आता कोरोना रुग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

मंडणगड : तालुक्यातील काेराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तालुक्यातील भिंगळाेली ग्रामीण रुग्णालय आता काेराेना रुग्णालय म्हणून सुरू करण्यात ...

मंडणगड : तालुक्यातील काेराेना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तालुक्यातील भिंगळाेली ग्रामीण रुग्णालय आता काेराेना रुग्णालय म्हणून सुरू करण्यात आले आहे. हे रुग्णालय गुरुवार दि. २२ एप्रिल २०२१ पासून उपचारासाठी सुरू करण्यात आले आहे.

मंडणगडातील कोरोना रुग्णांना उपचाराकरिता खेड, दापोली, रत्नागिरी या ठिकाणी जावे लागत होते; मात्र सध्या जिल्ह्यात सर्वत्र रुग्ण वाढत असल्याने रुग्णालयेही फुल्ल झाली आहेत. त्यामुळे मंडणगड तालुक्यातही काेरोना रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. तालुक्यातील भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालय येथे हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. यामुळे आता तालुक्यातील कोविड रुग्णांवर तालुक्यामध्येच उपचार होणार आहेत. याआधी तालुक्यात केवळ कोविड केअर सेंटर सुरू आहे. याठिकाणी रुग्णांना तात्पुरत्या स्वरूपाचे ऑक्सिजन देण्याची व्यवस्था होती; मात्र अधिक ऑक्सिजनची गरज भासल्यास त्यांना पुढील उपचारासाठी खेड, दापोली अथवा रत्नागिरी येथे पाठवावे लागत होते. आता मात्र तालुक्यातील रुग्णांवर तालुक्यातच उपचार होणार आहेत. या रुग्णालयात २५ बेडची व्यवस्था करण्यात आली असून, याठिकाणी १० जंबो ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच आणखी १० ऑक्सिजन सिलिंडरची मागणी केली आहे. याठिकाणी आय.सी.यू व व्हेंटिलेटरची सुविधा सुरू करण्यात आलेली नाही. पहिल्याच दिवशी याठिकाणी ५ रुग्ण दाखल झाले असून, त्यापैकी दोन रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत आहे.

................................

अन्य तपासणी कुंबळे, पणदेरी, देव्हारे येथे हाेणार

ग्रामीण रुग्णालय येथे कोरोना रुग्णालय सुरू केल्यामुळे याठिकाणी होणारी दैनंदिन रुग्ण तपासणी व उपचार आता कुंबळे, पणदेरी व देव्हारे याठिकाणी होणार आहे. त्यामुळे यापुढे काेरोना स्थिती बदलेपर्यंत अन्य सर्व आजारांवरील उपचारासाठी हे रुग्णालय बंद राहणार आहे. कोरोना रुग्णालयाबरोबरच याठिकाणी आता वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, त्याचबरोबर चतुर्थ वर्गातील कर्मचाऱ्यांची आवश्यकता वाढली आहे.