शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण शेती कालबाह्य

By admin | Updated: November 2, 2015 23:59 IST

समीर जाधव : शेतमजूर नव्या मजुरीप्रमाणे न परवडणारे

खेड : अलिकडच्या काळात कोकणातील शेतकऱ्यांनी शेतीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहेत. काही वर्षापूर्वी खरिप हंगामात येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामात व्यस्त दिसत असत़ मात्र, आता त्याच्या उलट चित्र असून, ते चिंताजनक आहे. काळाच्या ओघात ग्रामीण शेती कालबाह्य झाली असून, याकरीता शेतकऱ्यांनी मानसिकता बदलण्याची गरज येथील प्रथितयश शेतकरी समीर सूर्यकांत जाधव यांनी व्यक्त केली आहे़ तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी तर आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेले शेतमजूर नव्या मजुरीप्रमाणे परवडणार नसल्याने ही शेती करणे आता अशक्य झाल्याचे सांगितले आहे़दरवर्षी शेती करणाऱ्यांची संख्या घटत असून, शेतकऱ्यांनी शेतीकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे़ तरूणवर्गही शेतीमध्ये उतरण्यास तयार नसल्याने काळाच्या ओघात कोकणातील शेतीच कालबाह्य होईल की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. कोकणात अनेक गावातून आई - वडील असेपर्यंतच शेती केली जात आहे. त्यापुढील त्यांची पिढी ही शिकलेली असल्याने शेतीत काम करेल, याची खात्री राहिलेली नाही. त्याशिवाय कोकणातील शेतकरी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास अजूनही तयार नसल्याने आपल्याकडील शेती तोट्यातच राहते.़ त्यातच महागाई वाढल्याने शेती करणे अवघड होत चालले आहे. कोकणात अनेकजण स्वत:ची शेती नसल्याने अर्ध्या हिश्शाने शेती करतात़ त्यामुळे तीही आता परवडत नाही. गावागावातून शेतीसाठी मिळणारे मजूरही कमी असून, उपलब्ध मजुरांची मजुरी शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. कष्ट ज्यादा आणि फायद्यापेक्षा तोटाच जास्त हे लक्षात आल्याने बाहेरूनच धान्य विकत घेण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी स्वीकारल्याचे दिसून येत आहे. एकूणच या सर्वांमधून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे कोकणातील शेतकरी जोपर्यंत आपल्या पारंपरिक शेतीचा हट्ट सोडत नाहीत तोपर्यंत त्यात सुधारणा होणे शक्य नाही़ शेती ही मागासलेल्या अवस्थेतच राहणार असून, असलेली शेती देखील कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे़ अनेक शेतकऱ्यांनी याबाबत आपली भूमिका प्रकर्षाने मांडली आहे़ यामध्ये त्यांची उदासीनता आणि नकारात्मताच दिसून येत असून, यामध्ये बदल घडवून आणणे आवश्यक असल्याचे समीर जाधव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)