शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

पावणेतीन लाखांचा दरोडा; चिपळूण तालुक्यातील घटना

By admin | Updated: February 27, 2015 23:17 IST

इतर तिघांनी घरात शिरून दोन सोन्याची मंगळसूत्र, ब्रेसलेट, चेन, दोन बांगड्या, अंगठी, हार असे दागिने व दहा हजार रुपयांची रोख मिळून दोन लाख ८८ हजारांचा ऐवज चोरून नेला

चिपळूण : तालुक्यातील कुशिवडे-खोडदेवाडी येथे २४ खोल्यांच्या घरात पाच चोरट्यांनी गुरुवारी रात्री दामू गावकर यांच्या घरात शिरून सोन्याचे दागिने व दहा हजारांची रोकड मिळून दोन लाख ८८ हजारांचा ऐवज लुटला. कुशिवडे-खोडदेवाडी येथे दामू गावकर यांचे लांबसडक चाळीसारखे २४ खोल्यांचे घर आहे. या घरातील वैशाली डिके यांच्या खोलीत हा दरोडा पडला. वैशाली व त्यांचे पती टीव्ही पाहत होते. कार्यक्रम चालू असताना रात्री १०.३० च्या दरम्यान वैशाली खोलीत आल्या. झोपण्यापूर्वी घराच्या मागच्या बाजूला जाण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला. त्याचवेळी दरवाजातून दोन पुरुष घुसले व त्यांनी वैशाली यांचे हात व तोंड दाबून त्यांना धरून ठेवले. इतर तिघांनी घरात शिरून दोन सोन्याची मंगळसूत्र, ब्रेसलेट, चेन, दोन बांगड्या, अंगठी, हार असे दागिने व दहा हजार रुपयांची रोख मिळून दोन लाख ८८ हजारांचा ऐवज चोरून नेला. (प्रतिनिधी)