शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
4
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
5
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
6
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
7
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
8
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
9
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
10
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
11
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
12
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
13
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
14
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
15
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
16
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
17
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
18
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
19
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
20
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 12:26 IST

सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राजापुरातील अर्जुना नदीसह कोदवली नदीचे पाणी वाढले आहे. तर खेडमधील जगबुडी आणि चिपळुणातील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

ठळक मुद्देचिपळुणातील वाशिष्टीचे पाणी वाढलेराजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा

रत्नागिरी : सोमवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. राजापुरातील अर्जुना नदीसह कोदवली नदीचे पाणी वाढले आहे. तर खेडमधील जगबुडी आणि चिपळुणातील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. 

रत्नागिरीतील चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने मार्ग बंद पडला आहे.रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणच्या नद्यांना पूर आला आहे. रत्नागिरी तालुक्यातील चांदेराई बाजारपेठेत काजळी नदीचे पाणी भरायला सुरुवात झाली आहे.

काजळी नदीने सकाळी १० वाजता इशारा पातळी ओलांडली आहे. काजळी नदीची इशारा पातळी १६.५० मीटर असून, सकाळी १० वाजता पाणीपातळी १७.२४ मीटर होती. धोका पातळी १८ मीटर आहे.दरम्यान, खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडली असून, पातळी वेगाने वाढत आहे. भरणे नाका पूल येथे सकाळी ८.३० वाजता पाण्याची पातळी साडेसहा मीटर होती. दहा वाजता ती ७.७५ मीटर एवढी झाली होती. इशारा पातळी सहा मीटर असून, धोक्याची पातळी सात मीटर आहे.त्याचबरोबर राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. नद्यांचे पाणी शहरात घुसू लागले असून, व्यापाऱ्यांनी दुकानातील माल इतरत्र हलविला आहे. चिपळुणातील वाशिष्टी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

 

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी