शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासनाची सुधारित नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २१ एप्रिल रोजी आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात ...

रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २१ एप्रिल रोजी आदेश निर्गमित केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात होण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कार्यालयीन उपस्थिती, विवाह सोहळा, खासगी, सार्वजनिक वाहतूक आदींबाबत २३ एप्रिल रोजी आदेश काढले आहेत.

या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालये (राज्य शासन, केंद्र शासन, स्थानिक प्राधिकरणांतर्गत) कोरोनाशी संबंधित आपत्कालीन सेवा वगळता केवळ १५ टक्के क्षमतेनेच कार्यरत राहतील. ज्या शासकीय कार्यालयांमध्ये १५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थितीची आवश्यकता असेल अशा शासकीय कार्यालयाच्या कार्यालयीन प्रमुखाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी यांची पूर्व परवानगी घ्यावी. आवश्यक सेवा पुरवठा करणाऱ्या व्यक्तींची संख्या सुद्धा कमीत कमी असावी. आवश्यकता भासल्यास ती १०० टक्के क्षमतेने वापरता येईल.

लग्न समारंभ फक्त एकाच हॉलमध्ये २ तासांमध्येच पूर्ण करावे लागतील. त्यासाठी जास्तीत जास्त २५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कुटुंबाला ५०,००० रुपये दंड होईल. तसेच कोरोनाची परिस्थिती सामान्य होईपर्यंत त्यास हाॅलबंदी घालण्यात येईल. यामध्ये जिल्हांतर्गत किंवा आंतरजिल्हा प्रवास करणे अपे‍क्षित नसून रहिवासी शहरामध्ये प्रवास करणे मर्यादित राहील. आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत प्रवास केवळ अत्यावश्यक सेवा किंवा अंत्यसंस्कार किंवा कुटुंबातील व्यक्तींचे तीव्र आजार या टाळता न येणाऱ्या प्रसंगांसाठी करता येतील. खासगी बसमध्ये एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना परवानगी असेल. उभे राहून प्रवास करण्यास मनाई असेल. आंतरशहर किंवा आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या बसमध्ये सर्व थांब्यांवर प्रवाशांच्या हातावर १४ दिवसांच्या क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल. हा शिक्का बस सेवा पुरविणाऱ्यानेच मारणे बंधनकारक राहील. थर्मल स्कॅनर तपासणीत लक्षणे आढळल्यास कोरोना केंद्र किंवा हॉस्पिटलमध्ये प्रवाशाला पाठविले जाईल.

कोरोना चाचणी करायची असल्यास या चाचणीचा खर्च संबंधित प्रवाशाकडूनच घेतला जाईल.

कोणत्याही चालकाने या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केल्यास त्याला १००००रुपयांचा दंड भरावा लागेल. वारंवार चूक झाल्यास कोरोनाची अधिसूचना संपेपर्यंत चालन परवाना रद्द करण्यात येईल. विशिष्ट ठिकाणच्या कोरोना परिस्थितीनुसार तिथून येणाऱ्या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारावा किंवा नाही, याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेऊ शकेल.

राज्य शासन किंवा स्थानिक प्रशासनाच्या बसेसला ५० टक्के आसन क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी असेल. इतर नियम खासगी वाहतुकीनुसार असतील. या आदेशाची अंमलबजावणी २२ एप्रिल ते १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अंमलात राहील.