निवृत्ती मारकवाड उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:34 IST2021-08-27T04:34:21+5:302021-08-27T04:34:21+5:30

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल महावितरण कार्यालयातील कर्मचारी निवृत्ती बापून्ना मारकवाड यांचा ‘उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी’ म्हणून सत्कार करण्यात आला. ...

Retired Markwad Excellent telegraph staff | निवृत्ती मारकवाड उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी

निवृत्ती मारकवाड उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल महावितरण कार्यालयातील कर्मचारी निवृत्ती बापून्ना मारकवाड यांचा ‘उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी’ म्हणून सत्कार करण्यात आला. रत्नागिरी परिमंडळाचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्याहस्ते सत्कार करून त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.

निवृत्ती मारकवाड यांचे मूळगाव नांदेड जिल्ह्यातील आंबुलगा (ता. मुखेड) येथे आहे. ते गेले अनेक वर्षे पाचल महावितरण कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. कंपनीने नेमून दिलेल्या कामानुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील विद्युत वाहिन्यांची देखभाल करणे, अचानक उद्भवणाऱ्या तांत्रिक स्वरूपाच्या समस्येचे तातडीने निराकरण करणे, त्याचप्रमाणे विद्युत पुरवठा सुरळीत ठेवणे व ग्राहकांना उत्तम सेवा देणे ही कर्तव्ये बजावलेली आहेत. ग्राहकांचे समाधान होईल, यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. आपले कर्तव्य बजावताना त्यांनी दाखवलेली कार्यतप्तरता, कामातील कर्तव्यदक्षता, निष्ठा व समर्पित वृत्ती या गुणांची दखल घेत त्यांची ‘उत्कृष्ट तारमार्ग कर्मचारी’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

Web Title: Retired Markwad Excellent telegraph staff