शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
4
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
5
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
6
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
7
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
8
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
9
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
10
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
11
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
12
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
13
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
14
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
15
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
16
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
17
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
18
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
19
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
20
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ८८ वर्ष जपलीय गांधीजींची ‘ती’ आठवण

By admin | Updated: February 28, 2015 23:43 IST

करंडकाला उद्या ८८ वर्षे पूर्ण

शोभना कांबळे / रत्नागिरी
राष्ट्रपिता महात्मा गांधी रत्नागिरीत आले असताना त्यांचे येथील लोकल बोर्डाने चंदनाचा हार व मानपत्राने गौरव करून त्यांचे स्वागत केले. या मानपत्राचा करंडक आजही येथील थरवळ कुटुंबाच्या पाचव्या पिढीपर्यंत जतन करण्यात आला आहे. या करंडकाला उद्या १ मार्च रोजी ८८ वर्षे पूर्ण होत आहेत.
महात्मा गांधी रत्नागिरीतील तेव्हाचे प्रसिद्ध वकील व्ही. डी. जोशी यांच्या खालची आळी येथील भागिरथी निवासात उतरले होते. अर्थात गांधीजींना पाहण्यासाठी रत्नागिरीकरांची प्रचंड गर्दी झाली होती.
दुसऱ्या दिवशी १ मार्च १९२७ रोजी शहरातील पटवर्धन प्रशालेच्या भव्य पटांगणावर स्वातंत्र्यलढ्याच्या अनुषंगाने त्यांचे भाषण झाले. यावेळी जिल्हा लोकल बोर्डाच्यावतीने त्यांचा चंदनाच्या हाराने आणि चांदीच्या करंडकातून मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. या करंडकावर ‘महात्मा गांधीजींस - रत्ननगरीत त्यांचे शुभगमनप्रसंगी रत्नागिरी लोकल बोर्डाकडून सादर अर्पण १ मार्च १९२७ असा मजकूर लिहिलेला व चरख्याचे चित्र रेखाटलेले होते.
त्याकाळी मानसन्मान केलेल्या वस्तुंचा लागलीच लिलाव करून गोळा झालेला निधी स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी वापरण्यात येत असे. यानुसार महात्मा गांधीजींच्या या चंदनीहाराचा, मानपत्र व करंडकाचा त्याच जागेवर लिलाव झाला. त्या काळचे रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपत थरवळ यांनी हा सन्मान ५०० रूपयाला विकत घेतला. हे सर्व पैसे स्वातंत्र्यलढ्याला देण्यात आले. उद्या १ मार्च रोजी या घटनेला ८८ वर्षे पुर्ण होत आहेत. या भेटीपासून गणपत थरवळ आणि त्यांचे दोन मुलगे मुकुंद व विश्वनाथ थरवळ देशभक्तीने भारावलेले होते. विश्वनाथ तर या सोहळ्याचे साक्षीदार होते. तर मुकुंदराव यांनी रत्नागिरीतील मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला होता. त्यांचे द्वितीय पुत्र सुभाष थरवळ यांच्याकडे सध्या हा करंडक जतन केलेला आहे. (प्रतिनिधी)