शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीकर आहेत पक्के चहाबाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 10:36 IST

Tea Food Ratnagiri- दिवसाची सुरूवात असो, प्रमोशनचा आनंद असो, नव्या खरेदीचे सेलिब्रेशन असो किंवा अगदी कंटाळा असो या प्रत्येक गोष्टीत कॉमन गोष्ट एकच असते, ती म्हणजे चहा. दिवस सुरू करण्यापासून झोपेपर्यंत कुठल्याही वेळी चालू शकणारी गोष्ट म्हणजे चहा.

ठळक मुद्देरत्नागिरीकर आहेत पक्के चहाबाज दरमहा स्पेशल चहाला येते १५ लाखांची उकळी

अरुण आडिवरेकररत्नागिरी : दिवसाची सुरूवात असो, प्रमोशनचा आनंद असो, नव्या खरेदीचे सेलिब्रेशन असो किंवा अगदी कंटाळा असो या प्रत्येक गोष्टीत कॉमन गोष्ट एकच असते, ती म्हणजे चहा. दिवस सुरू करण्यापासून झोपेपर्यंत कुठल्याही वेळी चालू शकणारी गोष्ट म्हणजे चहा.थंडीने हात कुडकुडत असताना वाफाळता कप हातात धरताना, मुसळधार पाऊस पडत असताना मित्रांसोबत टपरीवर कटींग पिताना येणारी मजा औरच. रत्नागिरी शहरालाही चहाचे हे कौतुक आहेच. म्हणून तर फक्त चहाची स्पेशल ठिकाणे रत्नागिरीत ठाण मांडू शकली आहेत.

रत्नागिरी शहरात हॉटेल आणि वडापावच्या टपऱ्यांवर होणारी चहाची विक्री कितीतरी मोठी आहेच, पण या स्पेशल चहावाल्यांकडे दररोज ५,१७०हून अधिक कप चहा संपतो. यानुसार फक्त स्पेशल चहातूनच रत्नागिरीत जवळपास साडेपंधरा लाखांची उलाढाल होते.गेल्या वर्ष-दीड वर्षात रत्नागिरीच्या बाजारापासून ते अगदी रेल्वे स्टेशनपर्यंतच्या रस्त्यावर तब्बल २० ठिकाणी असा स्पेशल चहा मिळतो.

पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात मिळणारा वेगवेगळ्या चवीचा चहा आता रत्नागिरीतही मिळू लागला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर या भागातून विशेष मसाले मागवून हा चहा तयार होतो. रत्नागिरीत सुरू झालेल्या चहाच्या नव्या दालनांमध्ये मिळणाऱ्या चहाची चव मात्र वेगवेगळीच आहे. लाखो रुपयांची उलाढाल होत असलेल्या या व्यवसायाने अनेकांच्या हाताला रोजगारही मिळून दिला आहे.स्वस्त आणि झटपटकमी खर्चात उपलब्ध होणारा व्यवसाय म्हणजे चहा. स्वस्तात झटपटपणे चहाची उपलब्धता करता येते. बाजारात चहाप्रेमींची संख्या कमी नाही, त्यामुळे चहाची दुकानेही वाढू लागली आहेत. कमी मनुष्यबळातही हा व्यवसाय करता येत असल्याने या व्यवसायाकडे अनेकजण वळले आहेत.

टॅग्स :foodअन्नRatnagiriरत्नागिरी