रामदास फुटाणे यांनी फटकारले

By Admin | Updated: October 18, 2015 23:57 IST2015-10-18T22:21:35+5:302015-10-18T23:57:16+5:30

‘कोमसाप’चे साहित्य संमेलन : त्याच साहित्यिकांना पुरस्कार परत करण्याचा अधिकार!

Ramdas Foutane reprimanded | रामदास फुटाणे यांनी फटकारले

रामदास फुटाणे यांनी फटकारले

रत्नागिरी : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या निषेधार्थ पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांना फटकारत ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी म्हणाले, या तिघांपैकी कोणाच्या चळवळीत साहित्यिकांनी काम केले आहे का, काम केले असेल तर नक्कीच आपल्याला पुरस्कार परत करण्याचा नैतिक अधिकार आहे.
कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) आणि कवी केशवसूत स्मारक मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या वेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष खासदार विनायक राऊत, उद्घाटक अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, ऊर्मिला पवार, आमदार उदय सामंत, ‘कोमसाप’चे केंद्रीय अध्यक्ष महेश केळुस्कर, केंद्रीय कार्याध्यक्षा नमिता कीर, कार्यवाह प्रशांत परांजपे, जिल्हाध्यक्ष सुरेश खटावकर, अण्णा राजवाडकर, विश्वस्त अरुण नेरुरकर, भास्कर शेट्ये, गजानन पाटील उपस्थित होते.
साहित्यिकाच्या डोक्यात हवा घालून न घेता समाज परिवर्तनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करत फुटाणे यांनी साहित्यिक ३६५ दिवसांच्या व्यस्त जीवनातून बाहेर कधी येणार, आपण काहीच करत नाही, असे सुनावले. (प्रतिनिधी)


आवाहन : सहभागी व्हा
अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्यासारखी मंडळी दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत असतील, तर साहित्यिकांनीही समाज परिवर्तनात प्रत्यक्ष सहभाग घेतलाच पाहिजे, अशा शब्दात फुटाणे यांनी साहित्यिकांना फटकारले.

Web Title: Ramdas Foutane reprimanded