शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीला विधानसभेची किनार

By admin | Updated: September 23, 2014 00:13 IST

अंतर्गत विरोधकांना शह : अध्यक्षपद देऊन लांजातील कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न

रहिम दलाल- रत्नागिरी  -विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षांतर्गत विरोधकांना शह आणि मतांची गोळाबेरीज यावर लक्ष केंद्रीत करूनच जिल्हा परिषद अध्यक्षपदी जगदीश राजापकर, तर सतीश शेवडे यांची उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. मागील अडीच वर्षे शिवसेना-भाजपा युती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून दूर होती. उपाध्यक्षपद आणि सर्व विषय समित्यांवर युतीचे सभापती होते. मात्र, अध्यक्षपद युतीकडे नसल्याची खंत सर्वच शिवसेना - भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मनाला टोचत होती. मात्र, रविवारी झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत युतीने संपूर्ण जिल्हा परिषदेवर आता कब्जा केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षाची भूमिका बजवावी लागणार आहे. राजापूर - लांजा विधानसभा मतदार संघात स्थानिक उमेदवार पाहिजे. ही मागणी निवडणुकीच्या तोंडावर वाढू लागली होती. कधी नव्हे ते पक्षांतर्गत स्पर्धक वाढू लागल्याने विद्यमान आमदार राजन साळवी यांना डोकेदुखी ठरु लागली होती. जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती दत्ता कदम यांनीही विधानसभेसाठी इच्छा व्यक्त केली होती. विरोधकांना शांत करण्यासाठी जिल्हा परिषदेची अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक समोर आल्याने आमदार साळवी यांनी आपली ताकद दाखवण्यामध्ये कुठचीही कसर बाकी ठेवलेली नाही. त्यातच लांजा तालुक्याला जिल्हा परिषदेच्या इतिहासात एकदाही अध्यक्षपद लाभलेले नाही. चिपळूण आणि दापोली तालुक्यातील इच्छुक असताना अध्यक्षपदाची माळ माजी सभापती जगदीश राजापकर यांच्या गळ्यात पडली. याचे श्रेय आमदार साळवी यांना जात असले तरी त्यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा राजकीय गोटात सुरु आहे. राजापकरांच्या निवडीने कदम यांना शह आणि कधी नव्हे ते लांजा तालुक्याला अध्यक्षपद मिळाल्याने येथील विकासाला आणखी चालना मिळणार असल्याने जनतेचा विश्वास त्या माध्यमातून संपादन येणार आहे.माजी आमदार बाळ माने यांचा मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये पाडाव झाला. मात्र, यावेळी त्यांनी सावध भूमिका घेत कोणत्याही समाजाला दुखावून चालणार नाही, याचा विचार करुनच त्यांनी शिक्षण व अर्थ समितीचे सभापती आणि आपले विश्वासू सहकारी सतीश शेवडे यांना उपाध्यक्ष पदावर बसवले. तसेच भाजपामध्ये अजूनही आपली ताकद किती आहे, ते पक्षांतर्गत विरोधकांना शेवडे यांच्या निवडीने माजी आमदार माने यांनी दाखवून दिले. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही आपल्या पथ्यावर कशी पडेल, हे गणित समोर ठेवूनच निवड करण्यात आली.