शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

शहराबाहेर मुरणाऱ्या पाण्याने ‘राजकीय थरार’

By admin | Updated: July 6, 2015 00:25 IST

रत्नागिरी नगरपालिका : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

रत्नागिरी : शहराबाहेर असलेल्या शिरगाव - तिवंडेवाडीतील ४१० फ्लॅटच्या इमारतींना नळजोडणी देण्यास शिवसेनेसह अन्य सदस्यांनी पालिका सभेत तीव्र विरोध दर्शवल्यानंतर ठराव स्थगित ठेवण्यात आला. मात्र, हा ठराव इतिवृत्तात मंजूर केल्याने पालिकेत राजकीय भूकंप झाला आहे. हा ठराव ३०८ अन्वये रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत असलेल्या व शहराबाहेर मुरणाऱ्या या पाण्यामुळे आता पालिकेत ‘राजकीय थरार’ निर्माण झाला आहे. १८ मेच्या पालिका सभेच्या सुरूवातीलाच शिवसेनेतर्फे तिवंडेवाडी येथे नळजोडणी देण्यास विरोध असल्याचे पत्र देण्यात आले होते. त्यानंतर सभेत हा विषय चर्चेस आल्यानंतरही शिवसेनेसह अन्य नगरसेवकांनी या ठरावाला विरोध केला होता. आधी शहरातील लोकांना पाणीपुरवठा सुरळीतपणे करावा. अनेक भागात नागरिकांचे पाण्याचे हाल होते आहेत. पाणी पुरवठा विस्कळीत आहे. जलवाहिन्या खराब झाल्या आहेत. असे असताना शहराबाहेर पाणी देण्यामागील नेमके प्रयोजन काय, असा सवालही करण्यात येत आहे. प्रत्यक्षात सभेच्या इतिवृत्तात ठराव मंजूर झाल्याचे दाखविण्यात आले. तसेच संबंधित ठिकाणी बिल्डरने जलवाहिनीही टाकली हे समजताच शिवसेनेचे नगरसेवक व अन्य लोकप्रतिनिधींनी दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना हा इतिवृत्तात मंजूर झालेला ठराव रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन दिले आहे. त्यावेळी याबाबतची पूर्ण माहिती घेऊन चुकीच्या पध्दतीने ठराव झालेला असल्यास रद्द केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांना भेटलेल्या नगरसेवकांनी सांगितले. हा ठराव चुकीच्या पध्दतीने मंजूर झाल्याचे निष्पन्न झाल्यास त्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात आणखीही काही नामंजूर ठराव इतिवृत्तात मंजूर तर झाले नाहीत ना, याबाबत शहरवासीयांत आता उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. (प्रतिनिधी)सेना-भाजपातील दरी रुंदावली...रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर हे भाजपचे असून, त्यांचा सव्वा वर्षाचा अध्यक्षपदाचा कालावधी येत्या २४ जुलै २०१५ रोजी संपत आहे. विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या मागणीनुसार सहा महिन्यांसाठी भाजपच्या नगराध्यक्षाला शिवसेनेने मुदतवाढ दिली. मात्र, विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युती तुटल्याने केवळ सहा महिन्यांसाठी नगराध्यक्षपद सव्वा वर्षानंतरही सोडण्यास मयेकर यांची तयारी नसल्याने शिवसेना आधीच संतप्त आहे. त्यामुळे भाजपची पालिकेत कोंडी करण्यासाठी शिवसेना सज्ज झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.