शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय ‘धक धक’

By admin | Updated: October 20, 2015 23:49 IST

रत्नागिरी पालिका : चार जागांसाठी पंधरा उमेदवार रिंगणात

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या ४ जागांसाठी १ नोव्हेंबर २०१५ रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत नेमके काय होणार, कोणाचा प्रचार फळाला येणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. प्रचाराचा वेग वाढला असतानाच कोणाकडे किती कार्यकर्ते याचाही हिशेब लावला जात असून, विजयाबाबतचे गणित मांडताना सर्वच पक्षांच्या नेत्या-कार्यकर्त्यांची धकधक वाढली आहे. राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष निवडणुकीच्या वेळी वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे ते अपात्र झाल्याने ही पोटनिवडणूक होत आहे. मात्र, या चारही जागा मुळात राष्ट्रवादीच्या असल्याने राष्ट्रवादी पुन्हा या जागा राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सेनेतून परत आलेले उमेश शेट्ये हे राष्ट्रवादीसाठी हुकुमाचे अस्त्र असल्याने या चारही जागा राष्ट्रवादीच जिंकेल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनाही वाटतो आहे. वाट्टेल ते झाले तरी या चारही जागा पुन्हा राष्ट्रवादीकडेच आल्या पाहिजे, असे निर्देश राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्यामुळे या पोटनिवडणुकीत राज्य पातळीवरूनही लक्ष दिले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार उदय सामंत यांनीही या पोटनिवडणुकीत किमान २ जागा जिंकण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. भाजपच्या प्रचाराचा छुपा वार कोणाला घायाळ करणार, असा प्रश्नही चर्चेत आला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या १९ आॅक्टोबर या शेवटच्या दिवसापर्यंत २४ पैकी ९ अर्ज मागे घेतले गेले. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात १५ उमेदवार उरले आहेत. सेना, भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी चार, मनसे २ व अपक्ष आशिष केळकर मिळून एकूण १५ उमेदवार या निवडणुकीत आपले भाग्य आजमावत आहेत. (प्रतिनिधी)चार जागा : त्यांची बोलती बंदप्रभाग २मधील २, तर प्रभाग चारमधील २ अशा चार जागांसाठी एकूण दोन्ही प्रभागात जुने जाणते नेते - कार्यकर्ते मतदारांना भेटून त्यांचे मत आपल्या उमेदवाराच्या पारड्यात टाकण्यासाठी मनपरिवर्तन करीत आहेत. मात्र, काही उमेदवारांचे मतदारांना नावही माहिती नसल्याने त्यांनी विकासकाम काय केले, हे विचारणेही आता अवघड झाले आहे.