शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: गॅसवाहू टँकर-मिनी बसच्या अपघातानंतर पंधरा तास पोलिस ‘ऑन ड्युटी’, एक कि.मी. परिसरात होती प्रवेश बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:53 IST

टाकी हलविण्यासाठी ३ क्रेन

रत्नागिरी : मुंबई - गाेवा महामार्गावरील निवळी (ता. रत्नागिरी) येथे गॅसवाहू टँकरने मिनी बसला धडक दिल्यानंतर गॅस गळती हाेऊन भीतीचे वातावरण पसरले हाेते. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पाेलिस अधीक्षकांसह पाेलिस घटनास्थळी दाखल झाले हाेते. सकाळी नऊ वाजल्यापासून ९६ पाेलिसांची कुमक या ठिकाणी कार्यरत हाेती. मध्यरात्री १२:५० वाजेपर्यंत पाेलिस या ठिकाणी कार्यरत राहून आपली ‘ड्युटी’ बजावत हाेते.रविवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान निवळी येथे बावनदी पुलाच्या पुढे वळणावर एक खासगी मिनी बस रत्नागिरीच्या दिशेने येत हाेती. त्याचवेळी जयगडहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गॅस टँकरने मिनी बसला समोरून धडक दिली. या अपघातात एकूण ३१ जण जखमी झाले होते, तर अपघातानंतर गॅस गळती हाेऊन आजूबाजूच्या परिसरात पसरू लागला हाेता. त्यामुळे माेठा अनर्थ घडण्याची भीती हाेती.या अपघाताची माहिती मिळताच पाेलिस अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय पाेलिस अधिकारी नीलेश माईनकर, रत्नागिरी ग्रामीणचे पाेलिस निरीक्षक राजेंद्र यादव घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम या मार्गावरील सर्व वाहतूक बंद केली. ही वाहतूक उक्षी, संगमेश्वर आणि पालीमार्गे वळविण्यात आली हाेती. त्यानंतर जखमींना स्थानिकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत कार्य केले. मध्यरात्री १२:५० वाजेपर्यंत पाेलिस या ठिकाणी कार्यरत राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून हाेते.रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, ४ अधिकारी, १७ अंमलदार व १० होमगार्ड, संगमेश्वर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, १ अधिकारी व ७ अंमलदार, देवरुख पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व १ अंमलदार, हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी, २ अधिकारी व १३ अंमलदार, रत्नागिरी वाहतूक शाखेचे ३ अंमलदार, रत्नागिरी शहर पाेलिस ठाण्याचे २५ अंमलदार व पाेलिस मुख्यालयातील ५ अंमलदार या ठिकाणी कार्यरत हाेते. रात्री वाहतूक नियंत्रणाकरिता १ अधिकारी, ३ अंमलदार व ३ होमगार्ड नेमण्यात आलेले होते.

३ अग्निशमन दलाच्या गाड्याघटनास्थळी जिंदल कंपनीचा एक, देवरुख नगरपंचायतीचा एक व एमआयडीसीची १ अशी एकूण ३ अग्निशमन दलाच्या गाड्या हजर हाेत्या.

टाकी हलविण्यासाठी ३ क्रेनगॅस टँकरची टाकी (कॅप्सूल) हलवण्यासाठी ३ क्रेनचा वापर करण्यात आला. ही टाकी रस्त्याच्या बाजूला करून ठेवण्यात आले आहे.

गॅसमुळे घराला, टपरीला आगगॅस टँकरचा गॅस कॅप्सूल २ व्हॉल्व तुटून त्यातून गॅस बाहेर पडून आजूबाजूला पसरला हाेता. या गॅसमुळे महामार्गाच्या शेजारी असणाऱ्या शांताराम बेडखळे यांच्या घराला आग लागली. या आगीत घरातील साहित्य, एक म्हैस, एक गाईचे वासरू भाजून जखमी झाले. तसेच रिक्षा, चारचाकी वाहन व दुचाकी जळून नुकसान झाले आहे. तसेच रस्त्याच्या शेजारील लहू साळुंखे यांची टपरी जळून खाक झाली.

स्थानिकांचा मदतीचा हातअपघातस्थळी सकाळपासून कार्यरत असलेल्या पाेलिसांना स्थानिक ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला. पाेलिसांच्या जेवणाची व्यवस्था या ग्रामस्थांनी केली हाेती. तसेच पाेलिस व जिंदल कंपनीनेही फूड पॅकेट मागविले हाेते.पाेलिसांनीच दाखल केले जखमींनाजखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात आली. याठिकाणी हाेणारी गर्दी, जखमींना रुग्णालयात दाखल करणे, त्यांचे केस पेपर काढणे यासाठी एक पाेलिस अधिकारी आणि अंमलदार तैनात करण्यात आले हाेते. त्यांना दुपारनंतर पाठविण्यात आले. मात्र, परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना सायंकाळी अपघातस्थळी बाेलावण्यात आले. त्यांना सायंकाळी ६ वाजता साेडून पुन्हा ९ वाजता बाेलावण्यात आले हाेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातPoliceपोलिस