शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

प्लँट नं. ७ च्या नावाने भरते उरात धडकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST

आवाशी : नवीन कामगार भरती, नवीन ठेकेदारी वा ठेकेदारीवरील नोकरभरती जर प्लँट नं. ७ ला असेल तर ‘प्लँट नं. ...

आवाशी : नवीन कामगार भरती, नवीन ठेकेदारी वा ठेकेदारीवरील नोकरभरती जर प्लँट नं. ७ ला असेल तर ‘प्लँट नं. ७ नको रे बाबा’ असाच सूर तोंडी आहे.

येथील घरडा केमिकल्स लि. या कंपनीचा रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट भाग स्वतंत्र आहे. कंपनीच्या मुख्य जागेत एकूण सहा प्लँंट आहेत, तर सातवा प्लँट हा आर अ‍ँड डी विभागात आहे. जवळपास दहा वर्षांपासून हा सात नंबरचा प्लँट उत्पादन घेण्यासाठी कार्यान्वित केला गेला आहे. इन्डोस्कार्ब हे उत्पादन येथे घेतले जाते. मात्र या प्लँटचे असे वैशिष्ट्य आहे की, नवीन नोकरभरती, नवीन ठेकेदारी वा ठेकेदारीवरील नोकरभरती करावयाची असेल तर कंपनी व्यवस्थापनाकडून प्लँट नं. ७ ची शिफारस केली जाते. मात्र तेथे काम करून गेलेला माणूस वा ठेकेदार ‘मला ७ नंबर प्लँटमध्ये कामच नको,’ असे बाहेर सांगतात. याचाच अर्थ हा प्लँट घातक स्वरूपाचा आहे का? किंवा येथे घेतले जात असणारे उत्पादन वा उत्पादनासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल याचे मानवी शरीरावर काही विपरीत परिणाम होतात का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

या प्लँटबद्दल अनेकांचे नकारात्मक उत्तर आहे आणि याच प्लँटमध्ये शनिवारी झालेल्या दुर्घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रत्येक कंपनीचे स्ट्रक्चरल ऑडिट व सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे घरडा केमिकल्सच्या या प्लँट नं. ७ बद्दल अनेकांच्या मनात असणाऱ्या अनुरुत्तरित प्रश्नांची उकल करण्याचेही आदेश द्यावेत अशी मागणी होत आहे. येथे काम करून गेलेल्या अनेकांशी याबाबत विचारणा केली असता सदर प्लँटमध्ये खूप त्रास होतो असे सांगितले जात आहे. कंपनीकडून पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षा साधनांबाबत संबंधितांचे काहीही विरोधी मत नाही; मात्र तिथे खूप त्रास होतो एवढेच सांगितले जात आहे. त्यामुळे सुरक्षा साधने वापरून कदाचित तेथील रसायनांचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असेल तर असले उत्पादन कंपनीने प्रामाणिकपणे बंद करावे. तेथे अन्य उत्पादनांचा विचार करावा, असाही सल्ला अनेकजण देत आहेत.