शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

फिशमिलचे बांधकामाला आक्षेप

By admin | Updated: October 21, 2015 21:29 IST

रत्नागिरी : मांडवी पर्यटन विकास सेवा संस्थेचे जिल्हाधिकाऱ्यांकडे गाऱ्हाणे

रत्नागिरी : पालिकेच्या मालकीचे भूखंड पालिकेला परत करण्याचे आदेश धुडकावून मांडवी पेठकिल्ला भागात रफीक नाईक यांचे ५०० टन क्षमतेच्या फिशमिल व खत निर्मितीच्या रासायनिक प्रकल्पाचे सुरू असलेले बांधकाम हे बेकायदा असून, ते तत्काळ थांबविण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्था मर्यादित, रत्नागिरीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या फिशमिलमुळे शहरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होणार असून, याची वेळीच दखल घेण्याची मागणीही यामध्ये करण्यात आली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, रफीक नाईक यांच्याकडे रत्नागिरी नगर परिषद मालकीचे भूखंड क्र. ४४ ते ४८ भाडेतत्वावर होते. पालिकेसोबत असलेल्या कराराप्रमाणे त्यांनी विहित मुदतीत भूखंडावर कोणतेही बांधकाम केले नाही. त्यामुळे त्यांनी कराराचा भंग केला आहे. परिणामी रत्नागिरी नगर परिषदेने २६ डिसेंबर २०१४ रोजी सर्वसाधारण सभेच्या ठरावाप्रमाणे २०६, २०७, २०८, २०९ क्रमांकाने नोटीस देऊन १५ दिवसांच्या मुदतीत भूखंड नगर परिषदेच्या ताब्यात परत देण्याचे आदेश दिले होते. या मुदतीत नाईक यांनी भूखंड नगर परिषदेला परत न करता रफीक नाईक एक्सपोर्टस प्रा. लि. या आपल्या कंपनीला ४ जुलै २०१४ रोजी पालिकेची कोणतीही परवानगी न घेता हस्तांतरीत केला. हे हस्तांतरण पालिकेच्या भाडेकराराविरुध्द व करारातील अटी, शर्तींचा भंग करणारे आहे. कारण भाडेकरारानुसार हा भूखंड कोणत्याही व्यक्तीला, भागीदारी संस्थेला किंवा खासगी कंपनीला हस्तांतरीत करता येणार नाही. या अटींचे उल्लंघन करून नाईक यांनी हा भूखंड खासगी कंपनीला हस्तांतरीत केला आहे. रत्नागिरी नगर परिषदेने या फिशमिलचे बांधकाम अनधिकृत असल्याची नोटीस २० आॅगस्ट २०१५ रोजी रफीक नाईक यांना बजावली. या बांधकामासाठी पालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच नगररचनाकार, रत्नागिरी यांच्या कार्यालयातूनही आवश्यक असलेल्या परवानग्या घेतलेल्या नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. दाट लोकवस्तीत आरोग्याला हानीकारक असा हा प्रदूषणकारी प्रकल्प नागरिकांना नको आहे. त्यामुळे पर्यटनावरही याचा परिणाम होणार आहे. (प्रतिनिधी)