शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
3
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
4
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
5
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
6
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
7
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
8
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
9
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
10
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
11
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
12
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
13
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
14
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
15
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
16
IPL 2026: भर मैदानात राडा? मग क्रुणाल पांड्याची इन्स्टाग्राम पोस्ट; त्यावर पूरननं केली 'अशी' कमेंट!
17
कार वापरताय? मग तुमच्या गरजेनुसार निवडा ‘हे’ विशेष ॲड-ऑन्स, वेळीच करा पैशांची बचत!
18
MCX Share Price: मार्च तिमाहीत एमसीएक्सचा नफा २९१% नं वाढला, ११ मे रोजी रॉकेट बनू शकतो शेअर
19
तामिळनाडूत सत्तेचं गणित जुळेना, विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाला विलंब, चाहत्यानं स्वत: पेटवून घेतलं!
20
नवीन फोन घेतलाय? मग 'या' ५ सेटिंग्ज लगेच करा; एका चुकीमुळे होऊ शकतं मोठं नुकसान!
Daily Top 2Weekly Top 5

कोकण मंडळ इमारत प्रश्न प्रलंबित

By admin | Updated: March 31, 2015 00:26 IST

जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा : पहिल्या सभेत विचारला गेला होता प्रश्न

टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोकण विभागीय शिक्षण मंडळाचे कार्यालय गेली तीन ते चार वर्षे भाड्याच्या इमारतीमध्ये भरत आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा मिळूनदेखील इमारतीच्या बांधकामाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. मंडळ सदस्यांच्या पहिल्या तदर्थ सभेमध्ये याबाबत सदस्यांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. परंतु याबाबत अंमलबजावणी झाली नाही.विशेष बाब म्हणून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी कोकण विभागीय शिक्षण मंडळाची निर्मिती करण्यात आली. यासाठी राज्य शासनाने स्वतंत्र आर्थिक तरतूद केली असल्याचे सांगितले जाते. कोकण मंडळासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय इमारत उभी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून काजरघाटी धार या ठिकाणी जागा मंजूर झाली आहे. ही जागा आता मंडळाच्या ताब्यात आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेली जागा मंडळाच्या ताब्यात येऊन एक वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटूनदेखील अद्याप या जागेला संरक्षक कठडादेखील बांधण्यात आलेला नाही. अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी करण्यापलिकडे कोणतेही विशेष काम आजपर्यंत झालेले नाही. याबाबत विभागीय मंडळात विचारणा केली असता बांधकाम करण्याचे सर्वस्वी अधिकार हे राज्य मंडळाकडे असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे विभागीय मंडळाकडून याबाबत पाठपुरावा होऊनदेखील राज्य मंडळाच्या संमतीशिवाय बांधकाम सुरु होऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
सध्या विभागीय मंडळ भाड्याच्या जागेमध्ये चालू आहे. या जागेसाठी मंडळाला प्रतिमहिना १,७५,००० रुपये भाडे द्यावे लागते. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाड्याची रक्कम मोजावी लागत असल्याने अगोदरच आर्थिकदृष्ट्या तोट्यात असणाऱ्या मंडळाला हा मोठा आर्थिक फटका बसत आहे. यासाठी लवकरात लवकर स्वत:च्या मालकीची इमारत उभी करण्यासाठी मंडळाने विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. मंडळाने या सर्व गोष्टीची दखल घेऊन इमारतीचा प्रश्न मार्गी लावावा व जिल्हाधिकाऱ्यांनी जागा दिल्यानंतरही त्या जागेबाबत कोणतीच हालचाल करण्यात येत नसल्यामुळे काहिंनी नाराजी व्यक्त केली. काजरघाटी येथील जागा मंडळाच्या ताब्यात आहे. मात्र, तेथे इमारतीचे बांधकाम कधी सुरू करणार, असा प्रश्न विचारला जात आहे. भाड्यापोटी दर महिन्याला द्यावे लागणारे पैसे इमारत झाल्यास टळू शकतील. (वार्ताहर)

नवीन जागेमध्ये कोकण विभागीय मंडळाच्या मालकीची इमारत उभी करण्याच्या दृष्टीने राज्य मंडळाकडून प्रक्रिया सुरु आहे. राज्य अध्यक्ष गंगाधर म्हणाणे यांनी जागेची पाहणी केली आहे. बांधकामाची प्रक्रिया सुरु होईल.
- व्ही. व्ही. गिरी.