शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाेलीस दलाने केली ७४ हजार लाेकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाेलिसांकडून ग्राम दत्तक याेजनेंतर्गत नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पाेलिसांकडून ग्राम दत्तक याेजनेंतर्गत नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या गावांमधील आत्तापर्यंत ७४ हजार लोकांची तपासणी केली आहे.

सध्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण माेठ्या प्रमाणात आढळत आहेत. ही वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी ग्राम दत्तक याेजना राबवण्यास सुरुवात केली आहे. पाेलीस दलाने जिल्ह्यातील ५२ गावे दत्तक घेतली असून, त्यामधली २८ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी गावे दत्तक घेऊन त्या गावातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करणे, गावामध्ये कोरोनाविषयक जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे.

पोलीस खात्यांनी १८० स्वयंसेवक घेतले असून त्यांना जिल्हा परिषदेमार्फत कोरोना चाचणी करण्याचे प्रशिक्षण दिले गेले आहे. हे प्रशिक्षण घेतल्यानंतर स्वयंसेवकांनी ५५६ लोकांची कोरोना चाचणी घेतली.

यामध्ये पोलीस, बीट अंमलदार, ग्रामकृती दल, वाडी कृती दल, आशासेविका, स्थानिक ग्रामस्थ यांच्यातर्फे गावात जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन जनजागृती करत आहेत. गावातील लोकांचे तापमान तपासणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे, तसेच कोरोना चाचण्या वाढवणे तसेच गावातील लोकांचे लसीकरण कसे लवकर होईल याचा प्रयत्न केला जात आहे. हे सर्व करताना पोलीस जर कोणी बाधित झाला तर त्याला विलगीकरण कक्ष किंवा पोलिसांसाठी तयार केलेल्या कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येते. सर्व पोलीस आपली काळजी घेऊनच हे कर्तव्य बजावत आहेत.

-----------------------------

कोरोनाचा काळ अजून संपलेला नाही लोकांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. ग्राम दत्तक योजनेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भाग कसा लवकरात लवकर कोरोनामुक्त होईल यासाठी पोलीस दल घरोघरी जाऊन जागृती करत आहे. लोकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात वारंवार धुणे या सर्व गोष्टी करणे गरजेचे आहे.

-डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी