शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
3
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
4
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
5
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
6
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
7
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
8
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
9
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
10
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
11
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
12
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
13
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
14
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
15
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
16
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
17
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
18
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
19
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
20
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
Daily Top 2Weekly Top 5

पाड्यांना मिळणार आता सकस खाद्य

By admin | Updated: May 21, 2015 00:07 IST

पशुसंवर्धन विभाग : ७५ लाखांची तरतूद

रत्नागिरी : गोधन वाढ आणि दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी कपिला उत्कर्ष योजना राबवून गाय व म्हशींच्या पाड्यांना वयात येईपर्यंत १०० टक्के अनुदानातून सकस व संतुलित पशुखाद्य पुरवठा करण्यात येणार आहे.शेतीला दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा असून, त्यावर कोकणात जास्त प्रमाणात लक्ष केंद्रीत केल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीस मोठा हातभार लाभणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून पशुधन वाढीसाठी विविध योजनांची चांगल्या रितीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग विशेष प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात कपिला उत्कर्ष योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाने ७५ लाख रुपयांची तरतूद करुन त्याची मागणी जिल्हा नियोजन मंडळाकडे केली आहे. या योजनेअंतर्गत गाय आणि म्हशीच्या पाड्यांना ते वयात येईपर्यंत १२ हजार रुपये किमतीचे खाद्य १०० टक्के अनुदानावर पुरवले जाणार आहे.त्याचबरोबर सुमारे १५०० रुपये किमतीचे क्षार मिश्रण व जीवनसत्त्वांचा पुरवठा केला जाणार असून, १५०० रुपये विम्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण १५ हजार रुपये एका पाड्यावर केले जाणार आहेत. त्यामुळे पाडे सुदृढ होण्यास मदत होणार असून, या योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी पशुसंवर्धन विभागाने आखणी सुरु केली आहे.या योजनेचा लाभ देण्यासाठी गावोगावी गोपालकांचा गट तयार करुन गटनिहाय लाभधारकांची निवड केली जाणार आहे. ही योजना तळागाळापर्यंत राबवता यावी, यासाठी महिला बचत गटांचा आधार घेण्यात येणार आहे. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांपर्यंत कमीत कमी वेळेत पोहोचणार असून, त्याचा फायदाही चांगला घेता येणार आहे. (शहर वार्ताहर)पशुधन वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्याला चांगल्या प्रकारे यशही येत आहे. त्याचप्रमाणे कपिला उत्कर्ष योजनेतून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देण्यासाठी गोपालकांचे गट तयार करुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे सोयीचे ठरणार आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न आहे.- डॉ. सुभाष म्हस्केजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जिल्हा परिषद, रत्नागिरी.