शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनवरील रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST

खेड: तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार, दि. १६ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजन लावलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. ...

खेड: तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार, दि. १६ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजन लावलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. अचानक ऑक्सिजन संपल्याने व्हेंटिलेटरवरील कोरोना रुग्ण दगावला असून, त्याच्या मृत्यूला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला, तर यावेळी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळून लावत वेळेत ऑक्सिजन जोडण्यात आल्याचे सांगितले.

तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार, दि. १६ रोजी सायंकाळी तीन वाजण्याच्या सुमारास व्हेंटिलेटर जोडून ऑक्सिजन पुरवठा करत उपचार सुरू असलेल्या रामचंद्र द्वारकाजी तांबे या कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाचा मुलगा दीपक तांबे याने आपण डॉक्टरांना त्यांचा ऑक्सिजन संपल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर नवीन ऑक्सिजन सिलिंडर जोडेपर्यंत रामचंद्र यांचा मृत्यू झाल्याचे व या घटनेला रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप यावेळी केला. मात्र, हा आरोप वैद्यकीय अधिकारी यांनी फेटाळत संपलेला ऑक्सिजन सिलिंडर तत्काळ बदलला होता. मात्र, रुग्णाची प्रकृती खालावली होती व त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

या घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. सायंकाळी उशिरा रुग्णालय परिसरात पोलीस पोहोचले. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलीस व प्रशासनाकडे केली. कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात शुक्रवार, दि. १६ रोजी व्हेंटिलेटरवर २ रुग्ण होते, यातील एक दगावला तर दुसरा रुग्ण व्यवस्थित आहे. या रुग्णालयात ऑक्सिजनवर २२ रुग्ण आहेत व इतर लक्षणे नसलेले १९ रुग्ण आहेत. एकूण ४३ कोरोनाबाधित रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत आहेत.

रुग्णालयातील कर्तव्यावर असणारे वैद्यकीय अधिकारी डॉ. विष्णू जाधव यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले की, एक महिना रामचंद्र तांबे हे या रुग्णालयात उपचार घेत होते. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना इतर ठिकाणी चांगल्या हॉस्पिटलला नेण्याचा सल्लाही देण्यात आला होता. त्यानुसार ते घेऊनही गेले, मात्र ते त्याचदिवशी पुन्हा परत आले, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी ड्युरा सिलिंडर संपला होता. मात्र, काही वेळेतच जम्बो सिलिंडर जोडण्यात आला होता, असे सांगत तांबे यांच्या मुलाने केलेल्या आरोपाचे त्यांनी खंडन केले. या घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस उपनिरीक्षक मोरे आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचले होते.