रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाची आज ऑनलाईन सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST2021-07-18T04:22:31+5:302021-07-18T04:22:31+5:30

रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) व रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्यातर्फे जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांसाठी रविवार, ...

Online meeting of Ratnagiri District Science Teachers Board today | रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाची आज ऑनलाईन सभा

रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाची आज ऑनलाईन सभा

रत्नागिरी : जिल्हा परिषद शिक्षण विभाग (माध्यमिक) व रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्यातर्फे जिल्ह्यातील सर्व विज्ञान शिक्षकांसाठी रविवार, १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आली आहे.

या सभेला शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड तसेच अगस्त्या फाऊंडेशनचे रवींद्र कुलकर्णी हे मार्गदर्शन करणार आहेत. या सभेमध्ये विज्ञानपूरक उपक्रमांची चर्चा, विज्ञान प्रश्नपेढी तयार करणे, कोरोना कालावधीत राबविलेले विविध उपक्रम, विविध स्पर्धा आयोजन तसेच अगस्त्या फाऊंडेशनचा उपक्रम अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षणप्रेमी यांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन विज्ञान शिक्षक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र इनामदार, उपाध्यक्ष राजू जानकर, कार्यवाह प्रभाकर सनगरे, कोषाध्यक्ष मोहन पाटील व सर्व कार्यकारिणी सदस्य व संचालक मंडळ यांनी केले आहे. ही सभा गुगल मीटवर होणार असून, लिंक सभेपूर्वी अर्धा तास जिल्हा विज्ञान शिक्षक ग्रुपमध्ये देण्यात येईल, असेही इनामदार यांनी कळविले आहे.

Web Title: Online meeting of Ratnagiri District Science Teachers Board today