शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना अतिक्रमणाबाबत नोटिसा जारी

By admin | Updated: November 14, 2014 00:20 IST

देवरूख नगरपंचायत : विविध संघटनांशी केली चर्चा

देवरुख : देवरुख शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. येथील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी देवरुख पोलिसांनी पुढाकार घेऊन नगरपंचायत आणि देवरुखातील विविध संघटनांना सोबत घेऊन एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर आता देवरुख नगरपंचायतीच्या वतीने व्यापारीवर्गाला अतिक्रमण हटविण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.नगरपंचायतीच्या गटारावर अतिक्रमण करुन आपल्या दुकानाचे साहित्य ठेवले आहे. तसेच गटारावर छप्पर असून, पायऱ्यादेखील बांधलेल्या आहेत. त्यामुळे रहदारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. हे अतिक्रमण व गटारावरील साहित्य सात दिवसात काढून घ्यावे अन्यथा नगरपंचायतीमार्फत आपले अतिक्रमण काढून घेण्यात येईल व माल जप्त करण्यात येईल. या साऱ्याचा खर्चदेखील अतिक्रमण केलेल्या व्यक्तींकडून घेण्यात येईल, अशा स्वरुपाची नोटीस देवरूख नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या सहीने व्यापाऱ्यांना देण्यात आली आहे.देवरुखात पार्किंगची व्यवस्था नसल्याने बाजारपेठांतील मार्गावरच दुतर्फा दुकानांसमोर वाहने पार्क केली जातात. तसेच दुकानांसमोर असणाऱ्या दुकानांच्या बोर्डमुळे दोन मोठी वाहने एकाचवेळी जाताना मोठी अडचण निर्माण होते. यामुळे वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मात्र, सध्या नगरपंचायतीने कठोर भूमिका स्वीकारल्याने यामध्ये कितपत फरक पडतो आणि त्याची ही कार्यवाही किती यशस्वी होते, हे येत्या काही दिवसात दिसून येणार आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास काहीअंशी देवरुख शहरातील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)