शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोगाचे नवे ५३ रूग्ण सापडल्

By admin | Updated: January 30, 2015 23:17 IST

सिंधुदुर्ग जिल्हा : पाच लहान मुलांचा समावेश, आरोग्य समिती सभेत बाब उघड

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय कुष्ठरोग कार्यक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी अखेर कुष्ठरोगाचे नवे ५३ रूग्ण आढळले असून, त्यात पाच लहान मुलांचा समावेश आहे. शुक्रवारी आरोग्य समितीच्या सभेत ही बाब उघड झाली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीची सभा येथील बॅ. नाथ पै सभागृहात सभापती गुरूनाथ पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य निकिता जाधव, भारती चव्हाण, संग्राम प्रभूगांवकर, जान्हवी सावंत, नम्रता हरदास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी अखेर आढळलेल्या कुष्ठरूग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. यापूर्वीचे ४४ रूग्ण औषधोपचार घेत असून, उर्वरित ६२ जणांना उपचारमुक्त करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. ३० जानेवारी ते २४ फेबु्रवारी दरम्यान वेंगुर्ले, कुडाळ, मालवण व देवगड या चार तालुक्यात विशेष कुष्ठरोग शोधमोहिम राबविण्यात येणार आहे. उर्वरित चार तालुक्यात कुष्ठरोग निर्मूलन आठवडा राबविण्यात येणार आहे. सर्वच आरोग्य केंद्रात आयुर्वेदिक उपचार व्हावेत, अशी मागणी सभेत करण्यात आली. दहा ठिकाणी जिल्हा परिषदेची आयुर्वेदिक रूग्णालये आहेत. त्याशिवाय ज्या आरोग्य केंद्रांत आयुर्वेदिक डॉक्टर्स उपलब्ध आहेत, अशा सर्व केंद्रांमध्ये आयुर्वेदिक औषधे पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला.आरोग्य सभापती पेडणेकर यांनी भेडशी आरोग्य केंद्रात औषध साठा नसल्याची माहिती सभागृहात दिली. परंतु आरोग्य अधिकारी डॉ. आठले यांनी पुरेसा औषध साठा असल्याची माहिती दिली. केवळ आशा स्वयंसेविका गरजेपेक्षा जास्त औषधे मागतात, त्यामुळे गैरसमज झाल्याचे ते म्हणाले. आंगणेवाडी यात्रेसाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. कुणकेश्वर यात्रेसाठीही उपाययोजना करण्यात येत आहेत. दोन्ही यात्रांसाठी प्रत्येकी दोन पथके तैनात करण्यात आली असून, या ठिकाणी स्वच्छ पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)निधी मागे जाणार?जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्र व उपकेंद्र बांधकामासाठी गतवर्षी १ कोटी २३ लाख रूपये प्राप्त झाले असून त्यापैकी अत्यल्प निधी खर्च झाला आहे. उर्वरित निधी मार्चअखेर खर्च न झाल्यास तो निधी शासनास परत करावा लागणार आहे.